ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

लीगल नोटीस, अटक वॉरंट आणि कोर्ट केसः तुरुंगवास कसा टाळावा? केस जिंकण्यासाठी काय करावं?

Astrology Remedies to Win a Court Case
तुमच्यावर वा तुमच्या मित्रा-नातेवाईंकावर कुणी केस केली असेल व ती केस कोर्टात उभी राहिली असेल, आणि आता ती जिंकण्यासाठी काय करावं याच्या चिंतेत तुम्ही असाल तर हि पोस्ट तुम्हाला थोडा दिलासा देईल अशी अपेक्षा करतो.जन्मपत्रिकेत सहावे स्थान हे शत्रू स्थान आहे. भांडणतंटे, कोर्टकचेर्‍या, इ. या स्थानावरून पाहतात.

आठवे स्थान मृत्यु स्थान असल्यामुळे अपमान, दीर्घ मुदतीच्या समस्या, गंभीर अडचणी, गंभीर आजार, अचानक मृत्यु, वगैरे इथे पाहतात.

आणि बारावे स्थान म्हणजे तुरुंगवास, आर्थिक नुकसान, तोटा, इ. दर्शवते.

जर तुमच्या पत्रिकेत या तीनही स्थानाशी संबंधित वाईट ग्रहयोग असतील, तर तुम्हाला आयुष्यात अशा प्रसंगांचा वारंवार सामना करावा लागतो.

अंकशास्त्रानुसार ६ भाग्यांक असलेल्या व्यक्तींनी शक्यतो त्यांचे नाव ३ अंकावर घेऊ नये. जर तसं असेल तर त्या जातकाला सतत कोर्टकचेर्‍यांना सामोरं जावं लागतं.

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान व संजय दत्त या दोघांच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू पडतं.

दोघांचाही भाग्यांक ६ आहे. (म्हणजे जन्मदिनांक, महिना व वर्ष यांची एकूण येणारी बेरीज) व दोघांचाही नामांक ३० आहे. म्हणून दोघंही कोर्टाच्या व तुरुंगाच्या जंजाळात अडकलेले आहेत. हे असं ३ आणि ६ एकत्र कधी असू नये.

यावर उपाय काय?


शक्यतो ३ क्रमांकावर नाव येणार नाही याची काळजी घ्या. (विशेषकरून ६ क्रमांक वाल्या लोकांनी.) तसेच, घराचा वा ऑफिसचा क्रमांक सुद्धा ३ वर येणार नाही याची काळजी घ्या.

३ क्रमांकवाल्या ऑफिस, दुकान, गोडाऊन, शो-रूम, इ. मध्ये नेहमी लीगल नोटीसा येत असतात. आता अशावेळी बिल्डींग वा ती बिझनेसची जागा बदलता येत नाही. म्हणून मग पर्यायी पण तितकेच प्रभावी असे उपाय करावेत. प्रत्येकाची जागा कुठे व कशी आहे, हे पाहून ते उपाय योजता येतात.

तुमची जन्मतारीख किंवा भाग्यांक ६ असेल आणि तुमचं नाव ३ वर येत असेल. तर सावध व्हा, ताबडतोब ते तपासून घ्या व त्यात जे चूक आहे ते आताच बदलून घ्या.

आणखी एक हमखास उपाय म्हणजे 'अ‍ॅडव्हान्स्ड हिलिंग'.

एक गृहस्थ एका कायदेशीर प्रकरणात काही चूक नसताना अडकले होते. त्यांच्या वकील साहेबांनी त्यांना 'अंडरग्राउंड' होण्याचा सल्ला दिला होता, कारण पोलीस त्यांना शोधत होते.

या 'अ‍ॅडव्हान्स्ड हिलिंग'चा त्यांना खूप चांगला फरक पडला आणि सगळ्या प्रकारच्या पोलीस प्रकरणांतून  व केसेस मधून ते सहिसलामत सुटले. मागे एका पोस्टमध्ये याविषयीचे प्रत्यक्ष अनुभव सविस्तर दिलेले आहेत.

तुम्ही वा तुमचे मित्र - नातेवाईक जर अशा कुठल्या कायदेशीर संकटात अडकले असाल किंवा कुणी मुद्दाम तुम्हाला अडकवलं असेल तर आमच्याशी त्वरीत संपर्क साधा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा