ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

ज्यांचं लग्न जमत नाही त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय. दिलेल्या वेळेत लग्न जमून येईल.


विवाहासाठी ज्योतिष उपाय
लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. ते नेमकं कधी करावं यावर अनेकांची अनेक मते असतात.

"लवकर करावं म्हणजे सगळं काही वेळच्या वेळी होतं", इथपासून, "आयुष्यात आधी सेटल होऊ दे, स्वतःच घर घेऊ दे, आणि मग बघू" इथपर्यंत.

ज्यांना इतक्यात लग्न करायचं नाही त्यांना भरमसाठ स्थळं चालून येतात, आणि जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत त्यांना चांगलं स्थळच मिळत नाही.


काही वेळा तर सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरळीत चालू असतानादेखील शेवटच्या क्षणी लग्न मोडतं.

आता गौतमचीच गोष्ट बघा ना...


एकतर त्याला आधीच लग्न करायची ईच्छा नव्हती.

पण घरच्यांनी डोक्याशी सारखी भुणभुण केली म्हणून तो लग्नाला तयार झाला.

मावशीने आणलेलं स्थळ, आत्या-आजीने पाठवलेलं स्थळ, ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून त्याने स्वतः शोधून काढलेलं स्थळ, अशी एक एक स्थळं पहात दिड वर्ष गेलं पण मनासारखी मुलगी काही त्याला मिळाली नाही.

शेवटी एक मित्राच्या लग्नात त्याची जान्हवीशी ओळख झाली.

जान्हवी त्याच्या मित्राच्या लग्नाच्या इव्हेन्ट मॅनेजमेंट ग्रुपमधली डान्स कोरिओग्राफर होती. त्याला ती बघता क्षणीच आवडली.

लग्नातील नाच-गाण्याच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली, त्यातून पुढे मैत्री आणि मैत्रीतून प्रेम.

हा पठ्ठ्या आधीपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता, त्यामुळे वायफळ वेळ वाया न घालवता त्याने लगेच तिला लग्नाचा विचारून टाकलं आणि तिनेपण कुठलेही आढेवेढे न घेता सरळ होकार दिला.

घरच्यांशी बोलणी झाली...  देणं-घेणं ठरलं...   साखरपुडा पार पडला... 

आणि लग्नाला महिना राहिलेला असताना जान्हवीने अचानक मन बदललं आणि फोनवर SMS पाठवून लग्न मोडून टाकलं.

गौतमला मोठा धक्का बसला.

त्यातून सावरण्यात पुन्हा एक वर्ष गेलं.

मग पुन्हा घरच्यांनी आग्रह धरला. पुन्हा एक मुलगी पसंत केली. आणि तिने पण आधी 'हो, हो' केलं आणि महिन्याभराने नकार कळवला.

असा एकूण ३-४ वेळा झालं आणि शेवटी गौतमचा आत्मविश्वास पूर्णपणे गेला. 

हे असं कशामुळे होतं ? 

 

 जन्मकुंडलीमध्ये ७ वे स्थान हे लग्नाचं/जोडीदाराचं स्थान आहे.

पुरुषांच्या पत्रिकेत शुक्र हा वधू(नवरी) दर्शवतो, तर महिलांच्या पत्रिकेत गुरू वर(नवरा) दर्शवतो.

पत्रिका जर व्यवस्थित असेल म्हणजे सातवं स्थान शुभ आणि हे दोन्ही ग्रह चांगल्या योगात असतील, तर लग्नाचा योग लवकर येतो आणि सुखाचा संसार होतो.

जेव्हा लग्नाला उशीर होतो, तेव्हा शुक्र, गुरू, शनि आणि मंगळ हे ग्रह बघतात.

 

गुरु व शुक्र वक्री असतील, सातव्या घरात शनि असेल वा सातव्या घराशी शनिचा घनिष्ठ संबंध असेल तर लग्नाला उशीर होतो आणि खूप अडचणी येतात. कारण शनि विलंबाचा कारक आहे. तो जिथे असेल तिथे ते काम करायला उशीर करतो.

मंगळ जर सातव्या घरात असेल किंवा त्याची त्या स्थानावर दृष्टी असेल तर अशा माणसाने वयाची २८ वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये. केल्यास जोडीदाराबरोबर पटत नाही, खूप भांडणं, वाद-विवाद होतात.

सूर्य जर सातव्या घरात असेल किंवा त्याची त्या स्थानावर दृष्टी असेल तर अहंकारी व गर्विष्ठ स्वभावामुळे लग्न जमत नाही. "माझ्या अपेक्षा", "आमच्याकडे अशी पद्धत आहे", "लग्नात मी हेच घालणार, असंच वागणार" , "माझं लग्न आहे, माझं आयुष्य आहे, मी, मी आणि मी", "मी म्हणेन तीच पूर्व दिशा", असा स्वभाव असतो. म्हणून लग्नाची बोलणी चालू असताना बर्‍याच वेळी या कारणामुळे लग्न मोडतात.

केतू जर सातव्या घरात असेल असेल तर तो वैराग्य निर्माण करतो. "कशाला उगाच लग्न वगैरे करा, मग बायको/नवरा डोक्याशी कटकट करणार", "मग मुलांची कटकट, त्यांची शाळा, आरडाओरडा, तेच ते कंटाळवाणे प्रकार, त्यापेक्षा नकोच ते, मी एकटाच बरा, स्वातंत्रप्रिय, वगैरे" हे असले विचार केतू देतो. म्हणून लग्नाला उशीर होतो.

राहू म्हणजे भिरभिरल्यासारखं होतं माणसाला. काय करू अन् काय नको, असं होतं. कुणाचंही ऐकायचं नाही. लग्न करून वर परत एखादं प्रेमप्रकरण पण करू का? का आणखी एक लग्न करून लपवून ठेवू? असे विचार येतात. घाईघाईत लग्न करायचं, मग नंतर पश्चाताप करायचा, मग पुन्हा तसंच घाईघाईत दुसरं लग्न करायचं, पुन्हा पश्चाताप, आणि मग हे चालूच. म्हणून लग्न जमत नाही, जमलं तर टिकत नाही. टिकलं तर आहे त्या जोडीदाराबरोबर सुसंवाद नसतो, सगळं लक्ष बाहेर.

असे अनेक प्रकारचे ग्रह, योग व ग्रहाच्या दृष्टी, त्यांची भ्रमणं वगैरे या सगळ्याचा अभ्यास करून मग ठरवावं लागतं कि नेमक्या कुठल्या दोषामुळे लग्नाला उशीर होतो आहे. आणि मग त्या दोषावर उपाय करून ते दोष मिटवावे लागतात आणि मग लग्न जमतं.

गौतमचं पुढे काय झालं? 

 

त्याच्या काकूने मला ईमेल करून सगळं सविस्तर सांगितलं होतं. मी त्यांना लगेचच "अ‍ॅस्ट्रॉलॉजी हिलिंग" सुरु  करायला सांगितलं.

'अ‍ॅस्ट्रॉलॉजी' म्हणजे "ज्योतिष" आणि 'हीलिंग' म्हणजे "दुखणं बरं करणे". 

पत्रिकेतले हे वाईट योग म्हणजे एक प्रकारचं दुखणंच आहे.

त्यामुळे हे ज्योतिषातलं दुखणं बरं करण्याचा उपाय म्हणजे:"अ‍ॅस्ट्रॉलॉजी हिलिंग".

पत्रिकेतील ग्रह-तारे यांचे वाईट योग आणि आयुष्यात आलेले वाईट अनुभव, दु:खद प्रसंग, अपेक्षाभंग, नैराश्य इ. गोष्टींमुळे आपल्याभोवती एक नकारात्मक ऊर्जा तयार होते.

त्या नकारात्मक ऊर्जेमुळे चांगल्या गोष्टी आपल्या नकळत आपण दूर करायला लागतो.

त्यामुळे आणखी उशीर, आणखी मनस्ताप आणि पुन्हा-पुन्हा तेच अपेक्षाभंग येत राहतात. जे गौतमच्या बाबतीत घडत होतं. 

"अ‍ॅस्ट्रॉलॉजी हिलिंग" मुळे हे सगळं थांबतं. 

हे हीलिंग पूर्ण व्हायला किमान ९० दिवस लागतात. या कालावधीत तुमच्याजवळची नकारात्मक ऊर्जा जाऊन तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी आयुष्यात घडायला लागतात.

त्यासाठी तुम्हाला फक्त:
१) तुमचं नाव,
२) वय, आणि
३) राहत्या गावाचं/शहराचं नाव,

एवढ्या ३ गोष्टी द्यायच्या असतात. बाकी सगळं हीलिंग, मंत्र जप वगैरे तुमच्या वतीने आम्ही करतो.

खूप प्रयत्न करून सुद्धा तुमचं जर लग्न जमत नसेल, किंवा
जमलेलं मोडत असेल किंवा
मनासारखं स्थळ चालून यावं असं वाटत असेल,
तर "अ‍ॅस्ट्रॉलॉजी हिलिंग" त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत आणि मुख्य म्हणजे दिलेल्या वेळेत लग्न जमून येतं. 

आता गौतमचंच उदाहरण बघा ...

गौतमचं हीलिंग संपल्यावर आठवड्याच्या आतच त्याचं लग्न जमलं. 

 

त्याच्या ऑफिसने त्याला जॉब ट्रेनिंगसाठी ६ महिन्याकरता जर्मनीला पाठवलं होतं. त्याच्या तयारीत असताना ऑफिसच्या दुसऱ्या ब्रँच मधल्या कर्मचाऱ्यांशी सारख्या भेटीगाठी होऊ लागल्या होत्या.

कारण सगळ्या ब्रँच मधले कर्मचारी मिळून एकत्र जाणार होते.

त्यात त्या दुसऱ्या ब्रँच मधून आलेल्या ग्रुपमध्ये त्याला "रिया" भेटली. (रिया HR ऑफिसर आहे. एकुलती एक आहे. स्वावलंबी आणि दिसायला छान आहे.)

गौतमची कामातील हुशारी आणि त्याचा प्रामाणिकपणा तिला आवडला. शिवाय एच. आर. मध्ये काम करत असल्याने त्याचा पूर्ण बायो-डेटा आणि करिअर ग्राफ तिला चांगलाच माहित होता.

तिला तो आवडला. तिने ट्रेनिंगच्या तयारीत असतानाच वेळ काढून गौतमला लग्नाचं विचारलं, याने होकार दिला. दोघे एकत्र जर्मनीला ६ महिने जॉब ट्रेनिंगसाठी गेले आणि तिकडून आल्यावर सुखाने लग्न पार पडलं.

गौतमच्या घरच्यांना खूप खूप बरं वाटलं.

४ वेळा लग्न मोडलं म्हणून आत्मविश्वास गमावून नैराश्यग्रस्त झालेला गौतम आज रियाबरोबर लग्न करून सुखात आहे.

तुम्ही जर तुमच्या वा तुमच्या कुणा जवळच्या मित्राच्या-नातेवाईकाच्या लग्नाच्या चिंतेत असाल आणि त्यांचं लग्न व्हावं असं वाटत असेल तर अधिक माहितीसाठी  इथे संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा