ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

जेव्हा अमेरीकन 'वॉल स्ट्रीट' वाले बिझनेसमेन त्यांच्या 'कंपनीची कुंडली' काढतात तेव्हा...


Business Horoscope: Kundali of Your Company
मनिला (फिलिपाईन्स) च्या एका क्लायंटशी नुकतीच ईमेलवरून चर्चा झाली. त्यानंतर विचार करता करता 'कंपनीची कुंडली' म्हणजे 'जन्मपत्रिका' तयार करून त्यावरून बिझनेस कसा वाढवता येईल यावर अभ्यास चालू होता. त्यात काही गंमतीशीर आणि उपयुक्त गोष्टी माझ्या समोर आल्या, म्हटलं ब्लॉग वर शेअर करू, म्हणजे बर्‍याच लोकांना त्याचा उपयोग होईल.


अमेरिकेमध्ये शेअर मार्केट /वॉल स्ट्रीट, गुंतवणूक, रिअल इस्टेट, इन्श्युरन्स, वगैरे सगळ्या प्रकारच्या मार्केट्स् चा अभ्यास करणार्‍या कंपन्या आहेत. त्यात मिशिगन मध्ये एका सुप्रसिद्ध अमेरीकन उद्योजकाची एक कंपनी आहे जी ३० वर्षापासून हे काम करते, या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे कि हि कंपनी मी वर नमूद केलेल्या सगळ्या मार्केट्स विषयी ज्योतिषी सल्ला देते.

वेगवेगळ्या क्षेत्रातले गुंतवणूकदार, उच्चपदस्थ बँक अधिकारी, पोर्टफोलिओ मॅनेजर, सर्टीफाईड फायनान्स प्लॅनर, स्टॉक ब्रोकर, आणि उद्योजक इ. सारख्या अतिश्रीमंत वर्गात मोडणार्‍या हजारो व्यक्ती  गेल्या ३० वर्षांपासून या कंपनीकडून बिझनेसविषयक ज्योतिषी सल्ला घेतात. अनेकांनी स्वतःदेखील त्यांच्या 'कंपनीची कुंडली' तयार करून घेतलेली आहे, आणि त्यानुसारच ते त्यांचे बिझनेसविषयक निर्णय घेतात. त्यांचं म्हणणं असं असतं, कि "आमचा 'मार्केटचा अभ्यास' खूप चांगला आहे, पण 'मार्केटचं टायमिंग' हे तुम्ही कितीही हुशार व अनुभवी असलात तरी ठरवू शकत नाही,(त्यासाठी ज्योतिषाचाच आधार घ्यावा लागतो)."

सुप्रसिद्ध अमेरिकन पत्रकार रॉबर्ट गोव्हर यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकातून अनेक वेळा ज्योतिषाचा बिझनेस आणि शेअर मार्केटशी गुंतवणूकीशी संबंध जोडला आहे. ते म्हणतात कि, "इतिहासात अनेक दाखले सापडतात कि महत्त्वाच्या घटनांच्या वेळी (त्यांचं आकलन करताना) आपण आकाशताल्या ग्रहांचा आधार घेतलेला आहे. फार पूर्वी आपल्याला प्रत्येक ग्रहासाठी वेगवेगळ्या कुंडल्या तयार करून, त्यांचा अंशात्मक अभ्यास करावा लागायचा आणि आता संगणकामुळे तशा कुंडल्या करणं आज सोपं झालंय. ती आकडेमोड कमी झाली आहे. इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर तुम्हाला आज काय लक्षात येतं ते हेच, कि सूर्यमालेत (ग्रहांची) खूप मोठी आणि महत्त्वाची हालचाल होत असते, आणि त्या हालचालीचा परिणाम हा मानवाच्या आयुष्यावरच तर होतोच होतो पण तो सबंध देशांवर सुद्धा होतो."

अमेरिकन अर्थखात्याचे पूर्व सचिव डॉनोल्ड रिगन यांच्या ताफ्यातईल प्रमुख अधिकार्‍याने सुद्धा जाहिरपणे सांगितले कि, वॉल स्ट्रीट वरचे अनेक स्टॉक ब्रोकर नियमितपणे ज्योतिष वापरतात हि जगजाहिर गोष्ट आहे.

आतापर्यंत शेक्सपियर, आईनस्टाईन पासून न्यूटन, मार्क ट्वेन पर्यंत अनेक शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, साहित्यिक, तसेच, थिओडोर रुझवेल्ट सारखे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वगैरे सगळ्या महान व्यक्तींनी ज्योतिषाची अनेक वेळा स्तुती केलेली आहे, हे मला माहिती होतं, पण बिझनेसमध्ये आणि तेही थेट 'वॉल स्ट्रीट' सारख्या ठिकाणी देखील ज्योतिषाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असेल हि माहिती माझ्यासाठी नवीन होती. पण कळाल्यावर खूप बरं वाटलं कि कुठल्याही प्रकारचा इगो न बाळगता एवढे उच्चशिक्षित व उच्च्पदस्थ लोक ज्योतिषासारख्या प्राचीन शास्त्राचा योग्य तर्‍हेने फायदा करून घेत आहेत.

माझ्याकडे जेव्हा जेव्हा कुणी उद्योजक त्यांचे प्रॉब्लेम्स् घेऊन येतात, तेव्हा त्यांच्या कुंडलीबरोबरच मी त्यांच्या कंपनीची सुद्धा कुंडली तयार करतो. व्यक्तीच्या कुंडलीमुळे त्या व्यक्तीच्या ऊर्जावलयाबद्दल माहिती मिळते आणि कंपनीच्या कुंडलीमुळे संपूर्ण कंपनीविषयी सगळी माहिती कळते. कंपनीमधल्या कुठल्या डिपार्टमध्ये काय चाललंय आणि भविष्यात काय घडू शकतं, त्यापासून कसं सावध रहावं, हे सगळं कंपनीच्या कुंडलीमुळे कळतं. 'कंपनीची कुंडली' असली म्हणजे नेमका प्रॉब्लेम कशामुळे झाला, त्याचं उगमस्थान कुठे आहे, ते समजतं. आणि मग मुळापासून उपाय केले की ती समस्या दूर होते. कंपनीची कुंडली अनेक प्रश्नांची उत्तरे देते. अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वीच नष्ट करते. एकूणच काय कि कंपनीची कुंडली हि सर्वतोपरी उपकारक आहे.

तुम्हाला तुमच्या कंपनीची/व्यवसायाची/ कुंडली काढून हवी असेल तर  तर इथे संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा