ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

रिअल इस्टेट एजंट आणि बिल्डर्/डेव्हलपरसाठी हमखास यश देणारे विशेष वास्तू व ज्योतिष मार्गदर्शन

Remedies For Real Estate Agents to Buy or Sell Properties


या आधी मी अनेक वेळा वेगवेगळ्या ठि़काणच्या लिखाणात नमूद केलंय कि माझ्याकडे रिअल ईस्टेट मधले अनेक क्लायंट्स् विचित्र केसेस घेऊन येत असतात आणि त्यात मी जे काही उपाय सुचवतो त्याचे रोमांचक अनुभव ऐकायला मिळतात. तशीच जरा अलीकडे घडलेली एक गोष्ट सांगतो.माझ्या फेसबुकच्या पेजवर अमेरिकेहून एक मेसेज आला. त्या माणसाचा तिथे एक बंगला होता तो काही केल्या विकला जात नव्हता. नावं ठेवायला जागा नव्हती जागेत, पण तरीही विकला जात नव्हता.

तिकडे "ओपन हाऊस'" नावाचा प्रकार असतो, म्हणजे ज्यांना ती जागा खरेदी करण्यात रस आहे असे सगळे लोक एकाच दिवशी येऊन ती जागा प्रत्यक्ष पाहून जातात. असे सगळे प्रकार करूनही ती जागा विकली जात नव्हती म्हणून त्याने मला मेसेज केला.

मी त्याला नेहमीप्रमाणे जागेचा नकाशा ईमेल करायला सांगितला, थोडे जागेचे फोटो काढून पाठवायला सांगितलं.

मग त्याचा व्यवस्थित अभ्यास करून माझ्या लक्षात आलं कि त्याच्या घरातल्या लोकांचा त्या घरात खूप जीव गुंतला आहे. जोपर्यंत ते लोक मनापासून जागेला निरोप देत नाहीत, तोपर्यंत कितीही प्रयत्न केले तरी ती जागा काही विकली जाणार नाही.


मी त्याला काही उपाय सांगितले, कुठल्याही प्रकारची कटकट न करता त्याने ते केले आणि वर्षभर पडून राहिलेली त्याची जागा फक्त पंधरा दिवसात विकली गेली.

तुमची जागा सुध्दा जर खूप दिवसांपासून पडून असेल आणि विकली जात नसेल तर तुम्हीदेखील ते उपाय करू शकता.

पण त्यापैकी नेमके कुठले उपाय करणार?

कारण प्रत्येक जागा वेगळी असते, त्या जागेची वास्तूदेवता वेगळी असते आणि त्यामुळे त्या जागेचे उपायही वेगवेगळे असतात.

आपण एकच उपाय सगळ्या जागांना सरसकटपणे वापरू शकत नाही

ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून बघायचं झालं तर, मंगळ हा रिअल इस्टेट, जमीन-जुमला, मालमत्ता इ. चा कारक ग्रह आहे.

तुमच्या पत्रिकेत मंगळ कुठल्या स्थानात आहे, कुठल्या योगात आहे. बलवान आहे कि निर्बल आहे, यावर तुमचं वैयक्तिक गृहसौख्य आणि रिअल इस्टेट क्षेत्रातलं यश अवलंबून आहे.

तुमची स्वतःची पत्रिका आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या नावाने बिझनेस करता त्या बिझनेसची(कंपनीची) पत्रिका, या दोन गोष्टी वरून तुम्ही तुमचं रिअल इस्टेट्मधलं यश निश्चित करू शकता.

तुम्ही जर रिअल इस्टेट एजंट असाल आणि तुमच्याकडून जमिनीचे व्यवहार किंवा इतर प्रॉपर्टिची कामं पूर्ण करायची असतील, कमिशन न बुडता मिळावं म्हणून जर उपाय हवे असतील, तर विशेष उपायांसाठी आम्हाला नक्की संपर्क करा.

तुम्ही जर का बिल्डर/डेव्हलपर असाल आणि तुमच्या नवीन स्कीम / टाऊनशिप मधल्या रेसिडेन्शियल व कमर्शियल जागा लवकर विकल्या जाव्यात किंवा भाड्याने दिल्या जाव्यात असे वाटत असल्यास, तर विशेष उपायांसाठी आम्हाला नक्की संपर्क करा.

तुम्ही एजंट वा बिल्डर यापैकी कुणी नसून देखील स्वतःच्या जागेचे व्यवहार करण्यात तुम्हाला अपयश येत असेल तर विशेष उपायांसाठी आम्हाला नक्की संपर्क करा. 

पुढील प्रकारच्या परिस्थितीत सल्ला उपलब्ध आहे:-
  1. जागा विकायची आहे. (बंगला, फ्लॅट, दुकान, ऑफिस, कारखाना, गोडाऊन, शोरूम, हॉटेल, बार, हॉस्पीटल, इ.)
  2. जागा खरेदी करायचं ठरवलं आहे, तर ती विकत घेऊ का नको? विकत घेतल्यास लाभेल का नुकसान होईल?
  3. प्रॉपर्टी लिटिगेशन मध्ये आहे, इतर कोर्ट केसेस चालू आहेत. निकाल आमच्या बाजूने लागेल यासाठी काय करू?
  4.  कागदपत्रांवाचून काम अडले आहे, तेव्हा योग्य त्या पर्यायी कागदपत्रांची काहितरी सोय होऊन व्यवहार पूर्ण व्हावा यासाठी काय उपाय करू?
  5. आमच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. पण कोर्टकचेर्‍या करून किंवा भांडणतंटे करून जागा परत मिळवण्याची आमची ताकद नाही. काहितरी करून आमची जागा आम्हाला ताब्यात मिळावी यासाठी काय उपाय करू?
  6. शासकीय अधिकारी, तलाठी, तहसीलदार, पोलीस, वकील इ. व्यक्ती त्रास देत आहेत. विनाकारण काम रेंगाळलेले आहे. ते लवकर मार्गी लागावे यासाठी काय उपाय करू?
     
अधिक माहितीसाठी व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी इथे संपर्क साधा.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा