ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

तुमचा पार्टनर समलिंगी (गे किंवा लेस्बियन) आहे का हे जन्मपत्रिकेवरून कसे ओळखाल?


How to Know If a Person is Gay or Lesbian
जोडीदार समलिंगी असल्यामुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. बर्‍याचवेळा मला कॉलेजात जाणार्‍या तरूण-तरूणींचे किंवा नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यांचे ईमेल्स येत असतात, तेव्हा त्यात एक प्रश्न गेल्या २-३ वर्षांत कॉमन झाला आहे. तो म्हणजे, "माझा प्रियकर वा प्रेयसी, नवरा वा बायको समलिंगी तर नाही ना? जन्मकुंडली बघून तुम्ही सांगू शकाल कि तो/ती समलिंगी आहे का?".

जन्मपत्रिकेवरून माणसाचा स्वभाव, आरोग्य, प्रेमप्रकरणे, विवाह, संतती, वगैरे सर्वश्रुत असलेल्या सगळ्या गोष्टी जशा कळतात, त्याचप्रमाणे खाजगी आयुष्यातील लैंगिकतेविषयीच्या गोष्टी सुद्धा कळतात.



ज्योतिषामध्ये कुंडली पाहण्याच्या, कालनिर्णयाच्या व भविष्य वर्तवण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. प्रत्येकाचा ज्योतिषाचा अभ्यास वेगवेगळा असतो. जसा ज्याचा वैयक्तिक अभ्यास तसा त्याचा अनुभव. त्यामुळे एखादी व्यक्ती गे किंवा लेस्बियन आहे कि नाही हे ओळखण्याचे अनेक निकष असणं स्वाभाविक आहे.

काही जण केवळ जन्मनक्षत्र व चंद्रराशीच्या आधारे निर्णय घेतात, तर काही जण नवमांश कुंडलीच्या आधारे निर्णय देतात. मी हे दोन्ही प्रकारचे निकष लावून पाहिले, पण या दोन्हीपेक्षा मला सगळ्यात जास्त अचूकपणा हा ग्रह, ग्रहांचे योग, त्यांच्या युती व ग्रहदशा यामध्ये अनुभवण्यास मिळाला.

म्हणजे केवळ एक ठरवून दिलेला ग्रहयोग आहे म्हणून ती व्यक्ती समलिंगी आहे, हे मला मान्य नाही. कारण, कधी कधी त्या ग्रहयोगावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर तसा ग्रहयोग असून सुद्धा ती व्यक्ती समलिंगी नसते. तसेच काही वेळा केवळ एखाद्या ग्रहाची महादशा चालू झाल्यावर तो ग्रह आयुष्यात खळबळ माजवतो आणि म्हणून मग माणसं जगापुढे स्वतःची समलैंगिकता (कमिंग आऊट ऑफ क्लॉजेट) जाहीर करतात.

काही वेळा खूप आनंदाने उत्साहाच्या भरात या नव्या सापडलेल्या ओळखीसोबत नवे आयुष्य सुरू करतात. आणि मग काही वर्षांनी कंटाळा येऊन पुन्हा जुन्या वळणावर येऊन थांबतात. इथे समलैंगिकता जाहीर केल्यावर होणारा जो आनंद आहे तो नेमका कशामुळे आहे हे कुणी फारसं बघत नाही. जोडीदाराचा कंटाळा आला, काहितरी नवीन करून बघण्याची ईच्छा आहे, किंवा पुरुषांची होणारी घुसमट, कौटुंबिक अन्यायाच्या बाबतीत त्यांची बाजू समजून घेणारं कुणी नसणं, त्यातून इतर समविचारी पुरुषांकडून सहानुभूती व प्रेम मिळेल या आशेने जाणं असो, अशी अनेक कारणं असतात.

या सगळ्या गोष्टींकडे ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून सांगायचं तर बर्‍याच वेळेला जन्मकुंडलीतल्या ग्रहांची येणारी महादशा व अंतर्दशा अवलंबून आहे. समलैंगिकतेचे कारक ग्रह म्हणून बुध आणि केतू या दोन ग्रहांकडे आपल्याला पाहता येऊ शकेल. या दोन ग्रहांची युती पत्रिकेतल्या ज्या घरात असेल, त्याप्रमाणे कमी-अधिक तीव्रतेने समलैंगिकतेची फळे अनुभवण्यास येतात.

प्रत्येक ग्रहाचा वयात येण्याचा, म्हणजे प्रौढ होण्याचा काळ ठरलेला आहे. तो काळ आला म्हणजे तो संबंधित ग्रह तशा प्रकारचे रिझल्ट्स देतो. तो काळ येण्यापूर्वी तो हवे असलेले रिझल्ट्स देत नाही.

लग्नाच्या सुरुवातीची काही वर्षे खूप प्रेमाने जातात आणि अचानक पतीला पत्नीविषयी किंवा पत्नीला पतीविषयी असलेलं आकर्षण संपून समलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटू लागतं, अशा वेळी पत्रिकेतले संबंधित ग्रह हे प्रौढ झालेले असतात. म्हणून ते 'त्यावेळी' रिझल्ट्स देतात, 'त्याआधी' देत नाहीत.

 म्हणूनच बर्‍याच ज्योतिषांची जन्मकुंडली बघून वर्तवलेली भविष्य खरी ठरत नाहीत. अशावेळी, "लग्नाच्या वेळी मला का नाही सांगितलं" किंवा "मुलाने / मुलीने आम्हाला फसवलं", वगैरे अशी कारणं काढून लोक एकमेकांशी भांडत बसतात आणि घटस्फोट घेऊन वेगळे होतात. त्याऐवजी ज्याला जन्मपत्रिकेतल्या या सूक्ष्म गोष्टी कळतात अशा एखाद्या जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा आणि योग्य ते उपाय करावेत. केवळ पत्रिका जुळल्या म्हणजे सुखाचा संसार होईल, असं आपण म्हणू शकत नाही. निदान आजकालच्या जगात तर नाहीच नाही.


समलैंगिकतेचं कट्टर समर्थन करणारे म्हणतात कि तुम्ही जन्मालाच अशा प्रकारे येता (You Are Born This Way), यात तुम्ही काहीच करू शकत नाही. तर त्याचा कट्टर विरोध करणारे म्हणतात कि हे सगळं शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडल्यामुळे व जनुकीय दोषांमुळे होतं.

ज्योतिषाच्या दृष्टीने बघितलं तर दोन्ही बाजूचं म्हणणं योग्य आहे. जन्माच्या वेळी ग्रहदशाच जर तशी असेल तर त्या ग्रहांची पत्रिकेतली जागा आपण बदलू शकत नाही. म्हणजे तुम्ही जन्मालाच 'तसे' आलेले आहात. आणि हेच जर जन्माला आल्यानंतर काही काळाने एखाद्या ग्रहाच्या भ्रमणामुळे वा महादशेमुळे जर आयुष्यात असे बदल घडले तर त्याचे बदल हे तुमच्या आरोग्यावर म्हणजे जनुकांमध्ये/हार्मोन्स मध्ये जाणवणारच आहेत. म्हणजे ते म्हणणं सुद्धा खरंच आहे.

इथे आपण लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी कि दोन्हीपैकी कुठलातरी एकच नियम आदर्श मानून तो प्रत्येकाला लावणं चुकीचं आहे.

त्यामुळे तुमचा प्रियकर/ प्रेयसी/ नवरा/ बायको हे समलिंगी आहेत का हे पाहण्यासाठी घाई घाईने निर्णय घेऊ नका. आधी पत्रिका दाखवून घ्या,  खरोखरच तुमचा जोडीदार समलिंगी आहे, कि केवळ जन्मपत्रिकेतल्या ग्रह दशेमुळे निर्माण झालेलं तात्पुरतं आकर्षण आहे, हे आधी ठरवा. आणि मगच आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घ्या.

अधिक माहितीसाठी व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी इथे संपर्क साधा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा