ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

सचिन-अशोक सराफ आणि महेश-लक्ष्या यांचे सूर जुळण्यामागचे रहस्य

हिंदी चित्रपट व मालिकांच्या शिर्षकापासून ते त्यात काम करणार्‍या कलाकारांपर्यंत आज जवळपास प्रत्येक जण अंकशास्त्राचा योग्य तो उपयोग करून घेत आहे. हिंदीतल्या अशा कलाकारांविषयी व चित्रपट-मालिकांविषयी नेहमीच चर्चा होत असते. आजकाल अशा प्रकारच्या चर्चांमुळे चित्रपटाला, मालिकेला व कलाकरांना, खेळाडूंना पुष्कळ प्रसिद्धी मिळते, आणि त्याचा खूप फायदा देखील होतो.

पण मराठीत मात्र चित्रपट-नाटक-मालिकांच्या बाबतीत अशी फारशी चर्चा होताना दिसत नाही. म्हणून मग  काही निवडक चित्रपट, नाटक , मालिका व कलाकार यांच्या बाबतीतल्या अंकशास्त्राच्या  दृष्टीने मनोरंजक, गंमतीदार व काहीशा उपयुक्त अशा गोष्टी इथे आजपासून मांडणार आहे. आपल्याला आवडतील अशी आशा करतो.

सुरूवात एका सदाबहार व तडफदार जोडगोळीने करतो. :- सचिन पिळगावकर व अशोक सराफ
या जोडगोळीने मराठी चित्रपटविश्वात अनेक यशस्वी चित्रपट दिलेले आहेत. पाहूयात या दोघांचे अंकशास्त्र विश्लेषण:


इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या दोघांच्या जन्मतारखा, व त्यावरून काढलेले दोघांचे दिनांक व भाग्यांक पुढीलप्रमाणे  : (दिनांक व भाग्यांक कसा काढावा हे इथे दिलेले आहे : अंकशास्त्राची तोंडओळख .)

सचिन पिळगावकर : १७/०८/१९५७  [  दिनांक ८ व भाग्यांक २  ]
अशोक सराफ ०४/०६/१९४७  [  दिनांक ४ व भाग्यांक ४  ]

४ व ८ हे एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. ४ व ८ वाल्या लोकांचं एकमेकांशी जेवढं पटतं, तेवढं इतर अंकाबरोबर पटत नाही. या केसमध्ये दोघांचे दिनांक तर जुळतातच पण त्यापेक्षाही दोघांचे नामांक जास्त जुळतात.

सचिन पिळगावकर या नावाचा नामांक आहे : ५१ / ६
अशोक सराफ या नावाचा नामांक आहे : ३३ / ६

दोघांचेही पहिले नाव 'सचिन' व 'अशोक' हे देखील एकाच क्रमांकावर येते : १८/९. 

३, ६ व ९ हे एका सिरीज मधले अंक आहेत. सचिनजींच्या यशस्वी चित्रपटांपैकी बहुतेकांची नावं हि याच ३, ६ व ९ क्रमांकामध्ये येतात.

आणखी एका सुप्रसिद्ध जोडगोळीत अशा प्रकारचं साम्य दिसून येतं. ती म्हणजे 'महेश कोठारे' आणि 'लक्ष्मीकांत बेर्डे' .

महेश कोठारे यांचा नामांक : ४९ /  ४
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा नामांक : ४९ / ४

या दोघांनी मिळून दिलेले सुपरहिट चित्रपट आपल्याला माहिती आहेतच.  अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी जमण्यामागेदेखील दोघांच्यातील ४ अंक कारणीभूत आहे. आणि जेव्हा  ४ अंकाच्या या तिन्ही
व्यक्ती एकत्र आल्या तेव्हा उडालेला 'धुमधडाका' आजही आपल्याला सुखावून जातो.

अशा अनेक जोड्या आपल्याकडे आहेत. अनेक विरुद्ध जोड्या देखील आहेत. नुसतंच जोड्यांविषयी नाही तर,  चित्रपटाचं यश-अपयश, वाद-विवाद, किस्से, प्रेमप्रकरणे, राजकीय व्यक्ती त्यांचे स्वभाव, त्यांचे एकमेकांविषयीचे 'सख्य', खुरापती, व्यवसाय, क्रिडा, इतिहास, धर्म-अध्यात्म, इतर सामाजिक  घडामोडी, वगैरे या सगळ्याच्या मागे जे अंकांचे प्रताप  आहेत, त्याविषयी हळूहळू पुढच्या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेऊयात. भेट देत रहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा