ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

अंकशास्त्राची तोंडओळख व त्यातील संज्ञांचा अर्थ

दिनांक म्हणजे काय व तो कसा काढावा :
दिनांक म्हणजे तारीख. पण अंकशास्त्रात दिनांक म्हणजे त्या दिवसाच्या तारखेचा एक आकडी अंक. उदा. आज २१ तारीख आहे तर आजचा दिनांक २+१ = ३ आला. उद्याचा दिनांक २२ म्हणजे २+२= ४. परवा २३ तारखेचा दिनांक २+३ = ५.  १० तारखेचा दिनांक १+०= १.

भाग्यांक म्हणजे काय व तो कसा काढावा :
एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जन्मताखेचा एक आकडी अंक म्हणजे भाग्यांक. उदा. आज तारीख २१/०५/२०१४ . म्हणून आज जन्मलेल्या व्यक्तीचा भाग्यांक म्हणजे तिचा दिनांक , महिन्याचा अंक आणि वर्षाचा अंक यांची बेरीज करून आलेला एक आकडी अंक. २+१+०+५+२+०+१+४ = ४२ / ६.
( टीप. : काही अंकशास्त्रज्ञ दिनांकाला 'भाग्यांक' म्हणतात , व भाग्यांकाला 'मूलांक' असे म्हणतात. )नवग्रह आणि त्यांना दिलेले अंक व वार :
  • रवि : १ (रविवार)
  • चंद्र : २ (सोमवार)
  • मंगळ : ९  (मंगळवार)
  • बुध : ५ (बुधवार)
  • गुरू : ३ (गुरुवार)
  • शुक्र : ६ (शुक्रवार)
  • शनि: ८  (शनिवार)
  • राहू : ४ 
  • केतू : ७  

अंक व त्याचा प्रभाव असलेल्या व्यक्ती :

१) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज १ येते, त्या व्यक्ती १ अंकाच्या व्यक्ती होत. 

२) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज २ येते, त्या व्यक्ती २ अंकाच्या व्यक्ती होत. 

३) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज ३ येते, त्या व्यक्ती ३ अंकाच्या व्यक्ती होत. 

४) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ४, १३, २२, ३१ तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज ४ येते, त्या व्यक्ती ४ अंकाच्या व्यक्ती होत. 

५) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज ५ येते, त्या व्यक्ती ५ अंकाच्या व्यक्ती होत. 

६) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या  ६, १५, २४ तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज ६ येते, त्या व्यक्ती ६ अंकाच्या व्यक्ती होत. 

७) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज ७ येते, त्या व्यक्ती ७ अंकाच्या व्यक्ती होत. 

८) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या  ८, १७, २६ तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज ८ येते, त्या व्यक्ती ८ अंकाच्या व्यक्ती होत. 

९) ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ९, १८, २७ तारखेला झालेला आहे, तसेच ज्यांच्या दिवस, महिना व वर्ष यांची बेरीज ९ येते, त्या व्यक्ती ९ अंकाच्या व्यक्ती होत.

टीपा. :
वरीलपैकी ४, ८ व ९ ( राहू , शनि व मंगळ ) या अंकावर व्यक्तीचे नाव असू नये असा शास्त्रसंकेत आहे. कंपनी, चित्रपट, पुस्तक, ब्रँड, वा तत्सम निर्जीव वस्तूंसाठी हे अंक चालू शकतात. पण सजीवांची नावे या अंकावर व त्यांच्या सिरीजमधल्या अंकावर ( ४, ३१, ४०, ८, १७, २६,३५,५३,४४,९, १८,२७,३६,६३ इ.) असू नयेत. 

काही काही वेळा या अंकावर नाव असलेल्या व्यक्तींना करीयर मध्ये यश मिळतं. पण त्याचबरोबर वैयक्तिक जीवनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार, अनैच्छिक गोष्टी, नैराश्य, अपयश, इ बाबींना  तोंड द्यावे लागतं.

अंकशास्त्रासंबंधी इतर उपयुक्त माहिती व केस स्टडीज् आपण आता यापुढील लेखांमध्ये पाहणार आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा