ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

वास्तूशास्त्राचा आणि 'मूल होण्याचा' वा 'न होण्याचा' काय संबंध ? संबंध आहे. कसा ते पहा...

लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. कुठेकुठे हिंडणं-फिरणं चालू असतं. तर्‍हेतर्‍हेची माणसं भेटत असतात. सध्या लग्न अणि लग्नानंतर मूल, यासंबंधीचे अनेक प्रश्न माझ्याकडे येत आहेत. त्यात एक प्रामुख्याने येणारा  प्रश्न म्हणजे - "वास्तूशास्त्राचा आणि मूल होण्याचा वा न होण्याचा काय संबंध ?" 

वास्तूशास्त्रानुसार घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वास्तूमध्ये एक दिशा-स्थान दिलेले आहे. त्यात जर काही बिघाड आला, तर त्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो. या विषयावर आजवर अनेक केसेस माझ्या झालेल्या आहेत. ईथे काही लेटेस्ट केसेस विषयी थोडक्यात निरिक्षणं व अनुभव सांगतो. काही पटतंय का बघा.

माझा हा ब्लॉग वाचून एका बाईंची एक ईमेल आली, त्यांना त्यांच्या वास्तू विषयी मार्गदर्शन हवं होतं. मी म्हटलं कशासंदर्भात जाणून घ्यायचयं, पैशाची अडचण आहे, कसलं आजारपण, कि अजून काहि ?  त्या म्हणाल्या, "तसलं काहीही नाही, मला तुमचा ब्लॉग आवडला, ब्लॉगवरचे अनुभव वाचून उत्सुकता वाटली म्हटलं वास्तू दाखवून घेऊ, काही दोष असतील तर  तुम्हीच सांगा." 

मी म्हटलं, हा काय प्रकार ? उगाच काही झालेलं नसताना डॉक्टरकडे जातो का आपण ?

तरी त्यांनी वास्तूचा आराखडा मला ईमेल केलाच. मी सहज त्यावर नजर टाकली आणि त्यांना विचारलं कि, "या घरात किती वर्ष राहता तुम्ही ? हे घर बदलणं शक्य आहे का तुम्हाला ? कारण इथे काही गंभीर वास्तूदोष दिसत आहेत, अशा दोषांमुळे 'मूल न होणे, वा असलेलं मूल  गंभीर आजारी पडणे, निधन होणे,' वगैरे असे भयानक परिणाम दिसून येतात, तुम्हाला असा काही अनुभव आलाय का इथे ?"

ते वाचून त्यांना धक्काच बसला, त्या म्हणाल्या की, या घरात ते गेल्या ४-५ वर्षापासून रहात आहेत. त्यांना एकूण ३ मुलं होती. या घरात आल्या आल्या पहिल्याच वर्षात त्यांची मोठी मुलगी (फक्त ७ वर्षाची) आजारपणाने वारली, आणि या घरात आल्यावरच त्यांच्या लहान मुलाचा जन्म झाला, आणि तो ही जन्मापासून 'मेंटली चॅलेंज्ड' आहे.

माझं वास्तूचं निदान बघून त्यांना जेवढा धक्का बसला त्याच्यापेक्षा जास्त धक्का मला त्यांची हि अशी  प्रतिक्रिया ऐकून बसला.  मी लगेच त्यांना विचारलं कि, तुम्ही आधी का नाही सांगितलं हे सगळं ? त्या म्हणाल्या कि, " मला कल्पना नव्हती कि नुसतं वास्तूचा आराखडा बघून हे असं सगळं सुद्धा कळू शकतं म्हणून. आणि आता काय उपयोग ? मुलगी तर गेली, मुलगा बरा होणार नाही कधीच, तो 'असा'च राहणार  आयुष्यभर, तेव्हा उगाच सार्‍या जगाला हे सांगून काय उपयोग ? म्हणून नाही सांगितलं."

भविष्यात आणखी गंभीर परिणाम भोगायला लागू नये म्हणून त्यांना मी घरात योग्य ते  बदल करून घ्यायला सांगितले व त्याचा त्यांना ईश्वरकृपेने खूप छान फरक जाणवला.

वास्तूदोषाचा इतका गंभीर परिणाम इतक्या त्वरेनेसुद्धा मिळू शकतो याचा त्यानिमित्ताने पुन्हा अनुभव आला.


दुसर्‍या एका केसमध्ये एका बाईंची एक लहान मुलगी मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यांचं सुद्धा नोकरी-धंदा, पैसा-पाणी, वगैरे सगळं काही उत्तम चालू आहे. फक्त एका वास्तू दोषामुळे मुलीच्या मागे हा आजार लागलेला.


तिसर्‍या एका केसमध्ये त्या यजमानांच्या लहान मुलाला तर शाळेत चोरी करायची सवय जडलेली. घरी  कुणाला तो ऐकत नाही. मनाला येईल तेच करतो. शेजार-पाजारून रोज तक्रारी असतात. ते यजमान अगदी त्रासून गेलेले मुलाला. तिथेही मूळ कारण हेच होतं- वास्तूदोष.

मूल न होणे, गर्भपात करावा लागणे, मूल झालंच तर ते मूल जन्मापसून गंभीर आजाराने त्रस्त होणे, वा निधन होणे, पुत्रसंतती न होणे, वारंवार कन्यासंतती होणे (इथे लिंगभेद बाजूला ठेवून केवळ वास्तूदोषापुरता विचार करायचा म्हणून नमूद केले आहे), झालेली संतती आजारग्रस्त असणे, इ. परिणाम वास्तूदोषांमुळे दिसून येतात. घरात मुलीची दिशा हि वायव्य आणि मुलाची आग्नेय असते. त्यात दोष निघाले कि हे असे गंभीर परिणाम दिसून येतात. योग्य उपायाने असे परिणाम टाळता येतात.

आता नुसत्या वास्तूदोषामुळे मुलं होत नाहीत, असं नाही.आरोग्याशी संबंधित बाकीच्या गोष्टीदेखील असतातच. पण जेव्हा सगळे वैद्यकीय उपाय करून काहीही होत नाही, त्यावेळी हा पर्याय निश्चितपणे करून पहावा.

विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे माझ्याकडे आलेल्या अशा सगळ्या केसेस आधी डॉक्टरचे सगळ्या प्रकारचे उपाय करून मग थकल्यावर, कंटाळल्यावर आलेल्या आहेत. वर नमूद केलेल्या तिसर्‍या केसमधल्या चोरीची सवय लागलेल्या त्या मुलाला तर डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारची निदानं करून वैतागून सोडलं होतं, कधी 'हायपर अ‍ॅक्टिव', कधी 'ATDT' , कधी अजून काही वेगळं. अशा प्रॉब्लेम्सवर कितीही औषधं-गोळ्या दिल्या तरी काहीही उपयोग होत नाही असे अनुभव संबंधित व्यक्तींचे नातेवाईक अनेकवेळा बोलून दाखवतात.

पत्रिका-वास्तू दाखवायला येणारे क्लायंट्स असो वा हिलिंग उपचारासाठी येणारे पेशंट्स, सगळ्यांचे सगळे प्रकार, किस्से आणि अनुभव ऐकून आपली संस्कृती व प्राचीन शास्त्रं किती उपयुक्त आहेत याची रोज खात्री पटत असते.

तुम्हाला जर मूल होणे वा न होणे यावर काही शंका असतील वा मूल होण्यासाठी उपाय हवे असतील, तर इथे संपर्क साधा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा