ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

आपली प्रार्थना देवापर्यंत 'त्वरीत' पोचवण्यासाठी मोबाईल फोनसदृश सोय

मागे एका लेखात मी देवाला कनेक्टिविटीच्या कक्षेत आणण्यासाठीचा उपाय दिलेला होता, तसेच ईच्छापूर्तीसाठी देवाकडे नवस कसा मागावा हे देखील सांगितलेलं आहे. हा लेख म्हणजे त्याच्याच पुढचा भाग.

प्रार्थनेत खूप शक्ती असते, असं म्हणतात. पण त्यासाठी ती प्रार्थना देवापर्यंत पोचायला तर हवी. ती पोचवायची कशी ? कोण मदत करेल ?

समजा, आपल्याला दुसर्‍या देशातल्या एखाद्या व्यक्तीला एक निरोप पाठवायचा आहे. तर तो निरोप त्वरीत पोचावा यासाठी आपण संदेशवहनाची कोणकोणती साधनं वापरू ?  तो निरोप जर आपण साध्या डाकसेवेने (पत्राद्वारे) पाठवला, तर असा निरोप पोचायला किमान काही आठवडे तरी लागतील. हेच जर आपण कुरियरने निरोप पाठवला तर थोडा लवकर पोचू शकेल. पण आपण जर थेट फोनच केला, तर मात्र तो निरोप त्वरीत पोचू शकेल. बरोबर ? 

हेच देवांच्या बाबतीत कसं होईल ? तिथे आपल्याला कोण मोबाईल जोडून देणार ?

वर नमूद केलेल्या उदाहरणाचा मी विचार करत बसलो होतो, तेवढ्यात मला मागे काही धार्मिक व अध्यात्मावरची पुस्तकं, ग्रंथ वाचत असताना वाचनात आलेली एक महत्त्वाची गोष्ट अचानकपणे आठवली. त्या ग्रंथानुसार देवाच्या प्रार्थनेच्या बाबतीत सुद्धा वर नमूद केलेल्या उदाहरणाप्रमाणे असतं. जेव्हा आपण
देवाकडे नुसतीच प्रार्थना करतो, तेव्हा ती देवापर्यंत पोचायला थोडासा वेळ लागतो (साध्या डाकसेवेप्रमाणे). हेच जेव्हा आपण देवापुढे दिवा/निरांजन लावून प्रार्थना करतो, तेव्हा ती पाचपट गतीने देवापर्यंत पोचते
(कुरीयरप्रमाणे). आणि जेव्हा होमकुंडाद्वारे वा यज्ञकुंडाद्वारे आपण प्रार्थना करतो, तेव्हा ती प्रत्यक्ष अग्नी देवाबरोबरच जात असल्याने देवापर्यंत "त्वरीत" पोचते (मोबाईल फोनप्रमाणे).

कसं काय ?

कारण प्रकाशरुपी अग्नीचा वेग हा अंदाजे १,८६,००० मैल्/सेकंद आहे. त्यामुळे आपली प्रार्थना देवापर्यंत त्या वेगाने जाते. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये देवाला प्रार्थना करताना अग्नीदेवाचे आवाहन करतात. देवाच्या नित्यकर्मात-पूजेमध्ये दिवा लावला जातो. महायज्ञ असो, होम-हवन असो, लग्न असो वा इतर लहान-सहान पूजाकर्म असो, ते पुण्यकर्म अशाप्रकारे अग्नीदेवाला साक्षीला ठेवून करतात. आणि कुठल्याही स्वरूपाचा सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी त्याची सुरूवात दिपप्रज्वलन करून अग्नीदेवतेला नमस्कार करून करतात. कारण अग्नीच्या साक्षीने केलेली प्रार्थना देवापर्यंत "त्वरीत" पोचते.  

आता प्रत्येकालाच होमकुंड वा यज्ञकुंडाद्वारे प्रार्थना करणं शक्य नाही. पण किमान देवापुढे दिवा/निरांजन लावणं तर शक्य आहे. तेव्हा आजपासूनच सुरूवात करा.

|| शुभं भवतु ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा