ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

पत्रिकेत बिघडलेले मंगळ- रवि आणि ब्रेन ट्यूमर/मेमरी लॉस: आले देवाजीच्या मना, डॉक्टरचे काही चालेना


हि पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पीटलमध्ये घडलेली घटना आहे. एका क्लायंटच्या ओळखीतून एकदा एक केस माझ्याकडे आली.

त्या माणसाचा दिड वर्षाचा मुलगा होता, त्याच्या 'ब्रेन कॉम्प्लिकेशन्स'मुळे त्याची २ मोठी ऑपरेशन्स् झाली होती, दोन्ही ऑपरेशन्स् अयशस्वी झाल्यामुळे त्या लहानशा बाळाला 'मेमरी लॉस' झाला होता.

घरचे लोक प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत होते, कारण एवढासा तो जीव मेमरी गेल्यामुळे  जन्मदात्या आईलासुद्धा ओळखत नव्हता. एकटक नजर लावून निपचित पडून रहायचा रात्रंदिवस.

त्याच हॉस्पीटलमध्ये 'ब्रेन ट्यूमर'च्या ऑपरेशन साठी एक मुलगी अ‍ॅडमिट होती. ती खूप घाबरलेल्या  मनःस्थितीत होती. तीची भीती जावी, तिने ऑपरेशनला व्यवस्थित प्रतिसाद द्यावा, आणि ते सुखरूप पार  पडावं, म्हणून तिची बहिण माझ्याकडे हिलिंग साठी आली होती.

मी तिची पत्रिका मागून घेतली, तीच्या बहिणीसाठी म्हणायला काही मंत्र दिले, आणि मग ऑपरेशनच्या ठरल्यादिवशी पर्यंत डिस्टंट हिलिंग दिलं.

त्या ऑपरेशनच्या दिवशी एकाच दिवसभरात एकूण नऊ ऑपरेशन्स झाली. ऑपरेशन झाल्यानंतर शुद्धीवर यायला साधारणपणे ४-५ तास ते १-२ दिवस लागतील असं डॉक्टर्सनी सांगून ठेवलं होतं. पण इकडे ऑपरेशन झाल्याच्या दिड तासातच हि मुलगी शुद्धीवर आली  आणि जणू काही साध्या तापासाठी तिला इथे भरती गेलं  होतं, अशा थाटात हसणं-खिदळणं चालू झालं तीचं. ऑपरेशन यशस्वी झालं होतं. त्यामुळे खूप रिलॅक्स आणि उत्साही वाटत होती. बाकीचे सगळे (त्या नऊ ऑपरेशन्स पैकी) अजून शुद्धिवर देखील आलेले नव्हते. पण तिला इतकं बरं वाटायला लागलं होतं, कि संध्याकाळपर्यंत तर ती हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर एक चक्कर सुद्धा मारून आली. तिथेच फिरत असताना एक जोडपं खूप चिंतेत बसलेलं तिला दिसलं, तिने त्यांना विचारलं कि कुणाला अ‍ॅडमिट केलंय, काय झालंय, वगैरे.

तेव्हा त्यांनी सांगितलं कि त्यांचा दिड वर्षाचा मुलगा आहे, २ ऑपरेशन्स् अयशस्वी झालीयेत आणि आता  कुणालाही तो ओळखत नाहीये. त्यांची सगळी हकिगत ऐकून तिने त्यांना माझं नाव सुचवलं, आणि लगेचच
त्याच दिवशी संध्याकाळी त्या बाळाचे वडील माझ्याकडे आले. मी त्यादिवशी पर्यंत इतकी गंभीर केस कधीच  घेतली  नव्हती. एक तर ते बाळ फक्त दिड वर्षाचं, त्यात एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करून सुद्धा  काहिही फरक पडलेला नाही, तिथे मी काय करणार ? मी माझ्या परीने त्यांना समजावून सांगितलं, कि मी  फक्त हिलिंग करू शकतो, आणि जपासाठी काही मंत्र देऊ शकतो. पण मेडीकलविषयी असा कुठलाही सल्ला मी तुम्हाला देऊ शकत नाही. एवढ्या गंभीर केसमध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारूनच निर्णय घ्यायला हवा.

पण तो माणूस रडायला लागला ते बघवेना माझ्याच्याने. एकुलत्या एका मुलाचं एवढ्या लहान वयात हे  असं व्हावं, हे  कुठल्या बापाला सहन होईल ? शेवटी हो-ना करता घेतली ती केस, म्हटलं पुढचं सगलं देवाकडे सोपवू. एका हिलरचं हे आद्य कर्तव्य असतं कि समोर आलेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी शक्य ते प्रामाणिक प्रयत्न करावे. मी त्या माणसाकडून त्याच्या मुलाचा फोटो मागून घेतला, आणि शांतपणे घरी जा म्हणून सांगितलं. 

पत्रिकेत षष्ठ स्थान हे रोग-आजाराचे स्थान असते. पण जेव्हा डॉक्टरांना सुद्धा दाद न देणारे आजार असतात, तेव्हा ते फक्त षष्ठ स्थान बघून नाही भागत. त्यासाठी इतर रोगाशी संबंधीत स्थाने देखील पहावे लागतात. त्याच्या त्याच स्थांनांमध्ये असणारे मंगळ व रवि ग्रह बिघडलेले होते.

 मी ग्रहमान, होरा, इ. बघून हिलिंग करतो, त्याच्यामुळे चांगले रिझल्ट्स मिळतात असा माझा अनुभव आहे.  त्याप्रमाणे मी हिलिंग चालू केलं.  त्या लहान बाळाला हिलिंगची ऊर्जा सहन व्हायला पाहिजे याची योग्य ती काळजी घेऊन हिलिंग करावं लागत होतं. रेकीचे म्हणून असे हिलिंगचे पहिले तीन आठवडे पार पडले.
तोपर्यंत आवश्यक त्या ग्रहाची दशा चालू झाली होती. मी लगेचच माझं ब्रह्मास्त्र वापरलं- त्या मुलासाठी एक 'क्रिस्टल ग्रिड' घालून टाकलं. अशा काही गंभीर आजारांमध्ये पेशी-जनुकं या पातळीवरचं हिलिंग करावं लागतं. म्हणून मग मी नंतर अ‍ॅडव्हान्स्ड हिलिंग चालू केलं.

आणखी दोन-चार आठवडे गेले, आणि त्या माणसाचा अचानक रात्री फोन आला. देवाचं नाव घेऊन फोन घेतला आणि जीव भांड्यात पडला. त्या माणसाने सांगितलं कि तो मुलगा आता ठणठणीत आहे, डॉक्टरांनी 'किमान सहा महिने तरी मुलाला आणू नका' असं सांगून सुद्धा तो त्याच्या मुलाला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला होता, तेव्हा तिथल्या डॉक्टर्सने त्या मुलाला ओळखलंच नाही इतका छान बदल झाला आहे त्याच्यात. जो मुलगा शून्यात टक लावून दिवस-दिवस शांत पडून रहायचा, तोच मुलगा आता बाहेरच्या अंगणात खेळू-बागडू लागला आहे.  जे लहान-सहान चाळे तो आजारी पडायच्या आधी करायचा ते आता हळूहळू आठवून परत करायला लागला  आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने त्याच दिवशी त्या माणसाला बाप म्हणून ओळखून बोबड्या स्वरात हाक सुद्धा मारली.

ऐकून धन्य वाटलं.  नकळतपणे हातून केवढं तरी पुण्याचं काम घडलं होतं माझ्या हातून. धन्य ते शास्त्र, धन्य ते शास्त्रकार आणि धन्य त्याचे अभ्यासक-प्रचारक-प्रसारक.


आपल्यापैकी  वा आपल्या मित्रा-नातेवाईकांपैकी कुणाला कुठल्याही प्रकारच्या शारिरिक, मानसिक, भावनिक/मानसशास्त्रिय आजाराविषयी जर मार्गदर्शन हवे असल्यास कृपया इथे संपर्क करावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा