ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

दत्त संप्रदायातील समस्त भक्तांना पुण्यसंचय करण्यासाठी एक सुवर्णसंधी

नमो गुरवे वासुदेवाय
नुकतीच एक महत्त्वाची पोस्ट वाचनात आली, त्यासंबंधीची माहिती इथे थोडक्यात देत आहे. ईच्छुकांनी संबंधित वेबसाईट वर जाऊन पूर्ण माहिती घ्यावी व नामजपाच्या पुण्यकर्मात सहभागी व्हावे, हि विनंती.

श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीमद्‍ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने दिनांक २७ डिसेंबर २०१२ रोजी, श्रीदत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर (प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र, कल्याण) येथील  परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी यांनी वरील "श्रीगुरु वासुदेव यंत्राचे" विमोचन केले.

सन २०१४ मध्ये असणार्‍या प.प. श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त || "नमो गुरवे वासुदेवाय" || ह्या सिद्ध मंत्राची १०१ कोटी जपसंख्या पूर्ण करण्याचा संकल्प श्रीगुरुजींनी केला आहे.

संकल्पपूर्ती साठी जास्तीत जास्त वासुदेव भक्तांनी यात सहभागी होऊन, यंत्रासमोर एकाग्र होऊन केलेला नामजप श्री गुरुनाथ कुलकर्णी (मो.क्र.9821872200, e-mail guru_kulkarni01@yahoo.co.in ) यांचेकडे नोंदवावा असे आवाहन 'प्रकाश ज्ञान शक्ती केंद्रा' मार्फत करण्यात येत आहे.
[वेबसाईटची लिंक : प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र]

ज्या लोकांचे गुरू  इतर संप्रदायातील आहेत,( उदा. प.पू. गोंदवलेकर महाराज, इ.) व त्यांचे अनुग्रहित/दिक्षा  मंत्र वेगळे आहेत, ते शिष्य-भक्त देखील ह्या नामजपात सहभागी होऊ शकतात. अधिक माहिती प्रत्यक्ष केंद्रात संपर्क केल्यावर मिळेल.

तसेच, 'प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र, कल्याण' येथे दर महिन्याला यज्ञयाग होत असतात. यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, हरिहर यज्ञ,पितृयज्ञ, नर्मदा स्वाहाकार,गंगालहरी स्वाहाकार,गीता यज्ञ,शक्ती स्वाहाकार इ.चा समावेश आहे.

ईच्छुकांनी संबंधित वेबसाईट वर जाऊन पूर्ण माहिती घ्यावी व नामजपाच्या पुण्यकर्मात सहभागी व्हावे. ज्यांना स्वतःला नाम जप करणे शक्य होणार नाही, अशा लोकांनी त्यांच्या संपर्कातील मित्र-नातेवाईक यांपैकी कुणाला नामजपात रस असल्यास त्यांच्यापर्यंत हि माहिती पोचवावी व पुण्यकर्मास हातभार लावावा, हि नम्र विनंती.|| शुभम् भवतु ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा