ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

ईच्छाधारी नागाचा 'नागमणी' आणि उद्योगधंद्यात भरभराट ? काय संबंध ?

क्रिस्टल्स ग्रिड
जपानमधून एका क्लाईंटचा एक ईमेल आला आहे. भावाशी भागीदारीत सुरू केलेला व्यवसायामधून भावानेच त्याला विश्वासघात करून बाहेर काढलं. त्याच्या हक्काचे पैसे दिले नाहीत. त्याने स्वतंत्रपणे नव्याने सुरू केलेला बिझनेस नीट चालत नाही. तिथे जपान मध्ये फारसं कुणी ओळखीचं नसल्यामुळे उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नाही. शेअर्स मध्ये काही लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आणखी काही पैसे तिथेच अडकून आहेत. हात घालेल त्या कामात अपयश येतंय. पैसे तर मिळत नाहीत, पण कर्ज तेवढं वाढतंय.

उपायाच्या बाबतीत त्यांच्याकडल्या ज्योतिष पासून फेंग शुई पर्यंत सगळे प्रकार करून झालेले. त्यात त्याला  त्याच्या एका भारतातल्या मित्राने सांगितलं, कि "ईच्छाधारी नागाचा नागमणी" म्हणून एक रत्न मिळतं ते विकत आण, आणि ते जवळ ठेव, म्हणजे अचानक धनलाभ होईल, प्रचंड पैसा मिळेल.सगळं कर्ज फिटून  जाईल,वगैरे,वगैरे. 

तर तो नागमणी फक्त दक्षिण भारतात मिळतो, व तो विकत घ्यायचा म्हणून त्याने जिथे नागमणी मिळतो,  तिथे चौकशी केली तेव्हा त्याची किंंमत, कमीत कमी तीन-साडे तीन लाख रुपयांपासून ते जास्तीत जास्त काही कोटी रुपये आहे असं समजलं. आता सुरूवातीच्या तीन-साडे तीन लाख रुपयांचा, म्हणजे तसा हलक्यातलाच असणार असं त्याला  वाटलं,  म्हणून मग त्याने इकडून-तिकडून ओळखी वापरून  चार-पाच लाख रुपये जमा करून तेवढ्या  किंमतीचा 'नागमणी' घ्यायचं ठरवलं.
त्याला तिथली कामं सोडून भारतात प्रत्यक्ष येणं शक्य होत नव्हतं, आणि नागमणी कुरियरने पाठवायला त्या पाठवणार्‍याने नकार दिला. म्हणून त्याने त्याच्या भारतातल्या एका विश्वासू मित्राला सगळा प्रकार सांगितला आणि तो नागमणी घेऊन यायला सांगितलं. योगायोगाने त्याचा तो भारतातला मित्र हा माझा नेहमीचा क्लाईंट निघाला. त्याला हा सगळा प्रकार संशयास्पद वाटला, आणि त्याने लगेचच मला फोन करून सगळं कळवून टाकलं. मी त्याला तो नागमणी विकत घ्यायला स्पष्टपणे नकार दिला. थोडं सुनावलं सुद्धा (नेहमीचा क्लाईंट असल्याने तेवढा हक्क त्याने दिला आहे.). नागमणीला नकार दिल्यामुळे ओघानेच त्याच्या मित्राची केस मग माझ्याकडे आली, कि एवढा नकार देताय, तर मग आता तुम्हीच काहितरी मार्ग काढा यातून.

त्याच्या केसच्या निमित्ताने एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि, आज कितीतरी ठिकाणी असे अनेक लोक ''स्नेक स्टोन" नावाने अव्वाच्या-सव्वा किंमती घेऊन 'नागमणी' विकत असतात. वास्तविक नागमणीचा आणि अचानक धनलाभाचा काहीही संबंध नाही. (ईच्छाधारी नाग फक्त सिनेमात असतो) नागमणी विषयी  माझा फार काही अभ्यास नाही, पण काही जाणकार लोकांशी चर्चा करून, त्यांना प्रत्यक्ष भेटून मला काही माहिती मिळाली आहे (ती इथे देणं मला प्रशस्त वाटत नाही). त्यावरून मी एवढंच नमूद करू ईच्छितो कि,  असा 'नागमणी' मिळवणं हे नागाच्या जिवावर बेततं, त्यामुळे ते त्याचा जीव घेतल्यासारखंच आहे. त्याचा असा धनलाभासाठी "कधीही" उपयोग होत नाही. जंगलात राहणारे लोक पैशासाठी नागांना पकडून तो नागमणी दलालांना विकतात. आणि ते दलाल लोक त्याच्याविषयी अशा अफवा पसरवून तो जास्त किंमतीला विकतात. आणि मनाने व परिस्थितीने खचलेले लोक केवळ आशेपायी अशा गोष्टींना बळी पडतात.

अशा प्रकरणांमध्ये अशा खोट्या समजूती पसरवून नागांना त्रास देऊन, त्यांचा जीव घेऊन, लोभापोटी पैसा कमावणारे लोक वेगळे असतात आणि त्याला बळी पडणारे लोक वेगळे असतात. (मधल्यामध्ये काहिही संबंध नसताना अशा खुळचट कल्पना काढल्या म्हणून ज्योतिषींच्या डोक्यावर ह्याचं खापर फोडलं जातं. असो.)


त्याच्या केसचा पूर्ण अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं कि, केस खूप हाताबाहेरची आहे. त्याच्या आजूबाजूच्या हितचिंतकांनी केलेले 'उद्योग' त्याला भोवत होते. नकारात्मक ऊर्जेने तो पुर्णपणे घेरला गेला होता. त्यात त्याच्या तिकडच्या घरात कुठेही त्यांच्या देवाचा साधा फोटोदेखील नाही. तो माणूस देवाचं  काहीही करत नाही. तिकडे जे कुणी जपानी ज्योतिषी वगैरे आहेत, त्यांच्या सल्ल्यानुसार त्याचे बरेचसे उपाय करून झालेले होते, त्याचा त्याला काहिही फरक पडलेला नव्हता. सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला कुठेही जागा नव्हती. 

यालाच मी 'हाताबाहेत गेलेली केस' म्हणतो. जेव्हा सगळे उपाय करूनही काहीही फायदा होत नाही, माणूस प्रचंड भीती-नैराश्य-दडपणाखाली असतो. आशेचा एकही किरण दिसत नाही. देवावरचा विश्वास उडालेला असतो. आणि अशा मानसिक अवस्थेत असताना कुणी कुठलाही लहानसा का होईना आशेचा किरण्/मार्ग दाखवला कि, मागचा-पुढचा कसलाही विचार न करता माणूस त्याच्या मागे धावत जातो. मग तो दाखवलेला मार्ग योग्य आहे कि अयोग्य, शक्य आहे कि अशक्य, खरा आहे कि फसवा, हे विचार करण्याइथपत मानसिक ताकद शिल्लक राहिलेली नसते. आणि अशाच मनस्थितीत असलेल्या लोकांचा गैरफायदा घेतला जातो.

असा क्लाईंट आला कि ज्योतिषी लोकांची जबाबदारी खूप वाढते. एकतर त्याचं मन आधीच्या अनुभवांमुळे पूर्वग्रहदूषित झालेलं असतं आणि त्यात देवाधर्मावर विश्वास राहिलेला नसतो. अशात मार्गदर्शन करायचं म्हणजे ते त्याच्या मानसिक अवस्थेचा नीट विचार करूनच करायला हवं. समोरच्याच्या मनाला उभारी देणं, योग्य दिशा दाखवणं, शक्य असेल ते अन् माहिती असतील ते सगळे उपाय करून त्याचा प्रश्नं सोडवणं, हे खरं ज्योतिषींचं काम आहे आणि ते झालं पाहिजे. (काही लबाड व संधीसाधू अपवाद वगळता) बरेचसे ज्योतिषी हे काम व्यवस्थितपणे करतात.

अशा हाताबाहेर गेलेल्या केस साठी मी नेहमी माझी ठेवणीतली अस्त्रं वापरतो. याच्या प्रॉब्लेम्सची तीव्रता पाहता, तेवढ्याच तीव्रतेचे उपाय हवेत. म्हणून मग मी एक मास्टर रिमिडी करून त्याला कुरियर ने पाठवून दिली (काही निवडक क्रिस्टल्स् , त्याचं अंकशास्त्रानुसार नवीन नाव, आणि एक अत्यंत प्रभावी असं मास्टर 'क्रिस्टल ग्रिड').

त्याच्याकडे ते पोहोचल्या दिवसापासून महिन्याच्या आतच चांगले परिणाम दिसायला लागले. आणि बरोबर साडे तीन महिन्यात त्याची गाडी व्यवस्थित रूळावर आली. शेअर्स मध्ये अडकलेले पैसे चांगल्या नफ्याने परत मिळाले. आता धंदा तेजीत चालू आहे. डोक्यावर कसलंही कर्ज नाही. शहराच्या आऊट साईडला असलेलं त्याचं ऑफिस तो मेन सिटी मध्ये शिफ्ट करणार करतोय. त्याच्या भावापेक्षा मोठ्ठं ऑफिस घेणार आहे म्हणाला. आता तिकडच्या त्याच्या चार-पाच जापानी मित्रांच्यापण केसेस येणार आहेत.

तंत्रज्ञानाचा फायदा बघा. ज्या माणसाला मी कधीही बघितलेलं  नाही, ज्याच्याशी साधं फोनवरही  कधी  बोलणं झालेलं नाही. अशा माणसाला केवळ ईमेलच्या माध्यमातून, (कुंडली नसताना) उपाय सांगून ते कुरियरने पाठवून दिले. आणि त्याचा त्याला एवढा छान फरक पडला. ज्ञात असलेल्या सगळ्या शास्त्रांचा व अभ्यासाचा असा उपयोग होताना पाहून खूप समाधान वाटतं. 

यात मोठा वाटा हा क्रिस्टल्सचा आहे. मला अशी एकही केस आठवत नाही, कि ज्यामध्ये क्रिस्टल्स अपयशी ठरले आहेत. क्रिस्टल्समुळे वास्तूचे महादोषसुद्धा कितीही जुने असले तरी ते काढता येतात. कुठल्याही जातीच्या, धर्माच्या व देशाच्या माणसाचा कुठलाही, कितीही सिरियस प्रॉब्लेम असो, त्याच्याकडे कुंडली असो वा नसो, प्रत्येक वेळी क्रिस्टल्स सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडतात. कधी कधी वेळ लागल्याचं आठवतंय, पण उशीरा का होईना सगळी कामं झालेली आहेत. अनेक बाबतीत क्रिस्टल्स् आपल्याला लाभकारक-उपकारक ठरू शकतात. त्यांच्यावर संशोधन होणं आवश्यक आहे. मी माझ्यापरीने त्यांचा अभ्यास, संशोधन व प्रयोग हे सतत करत असतो. कित्येकदा त्याचे परिणाम आकलनाच्या पलीकडे आणि चमत्कारिक असे अनुभवास येतात. म्हणून तर मी त्यांच्या उपयोगाला 'अस्त्र' म्हणतो.

तुम्हाला पण जर असा नागमणी वगैरे देऊन कुणी लुबाडत असेल तर सावध रहा. असा खरंचच कुठलाही स्टोन नसतो. त्याचा व्यवसायासंबंधी काहीही फायदा होणार नाही, उलट नागाच्या जीवाशी खेळल्याच पाप मात्र माथी लागेल.  अशा प्रकारला बळी पडून पैसे वाया घालवण्यापेक्षा आपल्याकडील जुन्या-जाणत्या, उपयुक्त  अशा शास्त्रांचा उपयोग करून स्वतःचा फायदा करून घ्या.

तुमची अवस्था सुद्धा जर थोडीफार त्या माणसासारखी असेल, कि व्यवसाय-धंदा व्यवस्थित चालत नाही, आलेला पैसा टिकत नाही, भावाने-मित्राने फसवलं, किंवा तुम्हाला धंद्यात आहे त्याच्यापेक्षा जास्त  भरभराट हवी असेल, तर तुम्ही देखील हे उपाय करू शकता. या गोष्टींचा त्या जपानमधल्या माणसाला (ज्याला मी कधी बघितलेलं देखील नाही वा कधी फोनवर देखील बोललेलो नाही) तिथे बसून एवढा चांगला  फरक पडला, तर तुम्हाला काही नाही पडणार ? अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा:- मार्गदर्शन व सल्ला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा