ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

ज्योतिषी सल्ला आणि एक थरारक अनुभव : देव तारी त्याला कोण मारी

नमस्कार !

१२ राशींचे राशीभविष्य
नवीन ब्लॉगवर आपलं स्वागत.

ब्लॉगची सुरूवात एका थरारक अशा केसने करतो.

आज दुपारी एक फोन आला आणि त्या अनुषंघाने एका जुन्या क्लाएंटच्या बाबतीत घडलेली एक घटना आठवली. त्याचं एक बिझनेस डील होणार होतं दिल्लीला. रियल इस्टेटचं.  ते व्यवस्थित पार पडावं आणि त्याच्या मनासारखे रिझल्ट्स् मिळावेत म्हणून तो माझ्याकडे सल्ल्यासाठी आला होता त्यावेळची हि गोष्ट, साधारणपणे २-३ वर्षांपूर्वीची.

मी त्याला ( तो साधारणपणे माझ्याच वयाचा असल्याने,  म्हणून अरे- कारे  ) योग्य वेळ, मूहूर्त, वगैरे काढून दिला. त्याची कुंडली बर्‍यापैकी अनुकूल होती त्या डिलसाठी. सगळे ग्रह जागच्या जागी.  चंद्रबल उत्तम.  अंकशास्त्रानुसार सगळ्या तारखा सुद्धा काढून  झाल्या. 

माझा रत्नांचा-स्फटिकांचा एक विशेष अभ्यास आहे. त्यानुसार त्याला मी २ प्रकारचे स्फटिक ( ग्रीन अ‍ॅव्हेंचुरीन [लकसाठी ] आणि सिट्रीन [पैशासाठी] ) वेगळे  काढून  त्याची माळ  गळ्यात  घालायला  सांगितली. ते सगळं त्याला दिलं. तो निघून गेला.

तो गेल्यावर माझ्या मनात शंका यायला लागली कि काहितरी विचित्र घडणार म्हणून. मी सुरूवातीला  दुर्लक्ष गेलं. मला वाटलं, एकाच दिवसात आज पुष्कळ क्लाएंट्स झालेत त्यामुळे अस्वस्थ वाटत असेल.

पण थोड्या वेळाने ती भावना तीव्र व्हायला लागली. मला वाटलं, त्याला सांगावं कि , बाबा रे अजून एक स्फटिकाची माळ ("ब्कॅक टूर्मलीन"ची. खास प्रोटेक्शन साठी असते ती) गळ्यात घालून जा. पण मग म्हटलं, त्याला उगाच वाटेल कि, मी आपलं मुद्दाम एक जास्तीची माळ विकून त्याच्या गळ्यात मारतोय, म्हणून मग काही बोललो नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्याचा फोन आला, सगळं कन्फर्म करण्यासाठी, कि काही राहिलं तर नाही ना करायचं ?  मी कुठलीही अढी मनात न ठेवता ती प्रोटेक्शनची माळ घेऊन जायला सांगितली. तो दुपारी आला आणि घेऊन गेला. मग माझं मन शांत झालं. तरीपण मी त्याला डिस्टंट हिलिंग दिलं. संध्याकाळी निघणार होता. आधी मुंबई, मग मध्य-प्रदेश आणि मग तिथून पुढे दिल्ली असा प्रोग्राम होता.

पुन्हा आठवडाभर त्याचा काही फोन नाही. ईमेल नाही. कसलाही संपर्क नाही. मला पण त्याच्या बाबतीत बर्‍या-वाईट कसल्याही इंट्यूशन्स् आल्या नाहीत. मला वाटलं त्याचं बिझनेस डिल व्यवस्थित झालं असेल. आणि तो कळवायला विसरला असेल. भेटायला येईल तेव्हा बोलणं होईलच सविस्तरपणे.

आठवड्यानंतर एका दुपारी त्याचा फोन आला. त्याला मला "तात्काळ" संध्याकाळी भेटायचं होतं. माझ्या ३-४ भेटी-गाठी ठरल्या होत्या संध्याकाळी. त्यातली एखादी तरी भेट दुसर्‍या दिवसावर ढकलता येते का हे बघत होतो मी तर ते तर जमेना.  उलट, भेट न ठरवताच एक दांपत्य सल्ल्यासाठी आलं. ते दोघं नात्यातले निघाल्याने तोंडावर नकार देता येईना. अजूनच उशीर झाला. शेवटी रात्री उशीरा तो आला. आणि त्याने जे सांगितलं ते  थक्क करणार होतं.

तो म्हणाला कि, तो आणि त्याचे बरोबरचे आणखी काही लोक ( कुणाची कुणाशी फारशी ओळख नाही. केवळ डिल निमित्त एकत्र जमलेले), असे सगळे जण एकूण १०-१५ जण त्या बिझनेस डिल साठी दिल्लीला निघाले होते. माझा क्लाएंट आणि ४-५ जण असे हे पुण्यातून मुंबईला गेले, तिथून त्यांना आणखी ५-६ जण मिळाले आणि तिथून हे लोक मध्य प्रदेशात गेले जिथे त्यांना अजून उरलेले ३-४ जण भेटणार होते. सगळ्यांनी मिळून पुढे दिल्लीला जायचं असं ठरलं होतं.  त्याप्रमाणे सगळं घडलं. दिल्लीला पोचले. डिलही मनासारखं झालं. प्रत्येकाला आपापल्या वाट्याचे पैसे मिळाले. 

ज्यप्रमाणे दिल्लीला गेले तसेच परत येऊन मध्यप्रदेशवाल्यांना तिथे सोडून, मग मुंबई आणि शेवटी पुणे
असं होणार होतं. त्याप्रमाणे हे मध्य प्रदेशात पोचले. रात्र खूप झाली होती. त्यामुळे हॉटेलात मुक्काम करून सकाळी निघायचं ठरलं.  एका हॉटेलात सगळी मंडळी उतरली. रात्री जेऊन-खाऊन आरामात सगळे झोपले.

तेवढ्यात चारही बाजूंनी त्या हॉटेलवर पोलीसांनी झडप घातली. सगळ्यांना उचलून आत टाकलं. जवळचे सगळे पैसे जप्त केले. मोबाईल, वगैरे काढून घेतला. आणि भरपूर चोप दिला.

मी त्याला विचारलं, तुला पण मारलं का पोलीसांनी ?  आणि मुळात पोलीसांनी झडप का घातली ?
मध्य प्रदेशातल्या पोलीसांना पुण्या-मुंबईच्या मुलांची माहिती दिली कुणी ? कशी ? का ?
काय केलंत काय नक्की तुम्ही दिल्लीला जाऊन, रियल इस्टेटच्या नावाखाली स्मगलिंगचं डिल तर केलं नाही ना ?

माझे सगळे प्रश्न थांबल्यावर तो म्हणाला, कि त्यांच्या १०-१५ जणांपैकी, मध्य प्रदेशातून जे ३-४ जण त्यांना जॉईन झाले, त्यातले २ जण हे पोलीसांच्या 'लिस्ट' वरचे होते. त्याच्या मागच्या महिन्यात झालेल्या एका डिल मधून त्यांच्याकडे हरणाची कातडी, हस्ती दंत, वगैरे वस्तू सापडल्या. तेव्हापासून पोलीस त्या दोघांवर पाळत ठेवून होते.  दोघेच जण असल्याने पोलीसांना महिनाभर चकवलं त्यांनी. पण १०-१५ जणांच्या आख्ख्या ग्रुप मध्ये असल्याने रात्री सापडले.

सगळ्यात गंमतीदार आणि चमत्कारीक गोष्ट क्लाएंटने नंतर सांगितली ती म्हणजे -  तो (माझा क्लाएंट) पोलीसांच्या हाती लागलाच नाही. कारण झडप  घातली  तेव्हा तो टॉयलेट मध्ये होता.


त्यामुळे अंगाला कुठेही न खरचटता हा तिथून रात्री गुपचूप बाहेर पडला. बरोबरचं जुजबी सामान, पैसे वगैरे घेतले. पहाटपर्यंत इकडे-तिकडे भटकत राहिला. आणि सकाळी गाडीकरून आरामात इकडे निघून आला.

तर अशा  प्रकारे, १५ जणांच्या ग्रुपमध्ये असून सुद्धा,  एका लहानशा हॉटेलच्या  लहानशा रूम मध्ये  असून सुद्धा, पाळतीवर असलेल्या पोलीसांच्या हाती न लागता, स्वतःचे पैसे, सामान, सगळं व्यवस्थित घेऊन हा सुखरूप पणे घरी पोचला. 

तो माझे आभार मानून मोकळा झाला. पण मलाच प्रश्न पडला कि नक्की या प्रकारात मी कुणाचे आभार मानू ?

ह्याच कारणासाठी त्या दिवशी, ह्याच्या पत्रिकेत सगळं काही आलबेल असतानादेखील माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती का ?...

आज ब्लॉग लिहायला सुरूवात करायची होती. कुठल्या पोस्टने करावी हा विचार मनात घोळत होता. तेवढ्यात दुपारी रियल ईस्टेट वाल्या दुसर्‍या एका क्लाएंटचा फोन आला, त्याला माझा सल्ला हवा आहे, त्यांचं एक  बिझनेस डिल आहे येत्या मे महिन्यात. आणि त्यासाठी तो आणि त्याचे काही मित्र जाणार आहेत- दिल्लीला ! :)

माझ्याकडे येणारे सगळे रिअल ईस्टेट व इतर फिरतीचे बिझनेसवाले क्लायंट्स यांच्या अनुभवावर एक पुस्तक लिहिता येईल, इतके प्रसंग मी रोज जवळून पहात-ऐकत असतो. ( ईच्छाधारी नागाच्या नागमण्याचा आणखी एक विचित्र प्रसंग) .

आपल्यापैकी कुणाला वैयक्तीक वा व्यवसाय-धंद्यासाठी मार्गदर्शन व सल्ला हवा असल्यास इथे संपर्क करा  : मार्गदर्शन व सल्ला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा