ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

नुसतं नावात बदल केल्याने एवढा फरक पडू शकतो ? न्यूमेरॉलॉजी नेम चेंज मॅजिक

अंकशास्त्राद्वारे नावात बदल (न्यूमेरॉलॉजी)
दोन महिन्यांपूर्वी एका मुलाचा मार्गदर्शनासाठी ईमेल आला होता. साठ हजार रुपये महिना पगारावर रिलायंस कंपनीत कामाला होता. नोकरीला ६ वर्षं झाली होती. खूप मेहनतीने काम करत होता, पण तरीही प्रमोशन  होत नव्हतं, पगारही वाढत नव्हता, शिवाय ऑफिसमध्ये चालणारं राजकारण त्याच्या दृष्टीने नवीन होतं. त्याच्या कामाचं श्रेय त्याच्या टीमच्या दुसर्‍या व्यक्तीला दिलं जातं, आणि टिम लीडर हे मुद्दाम करतो, असं त्याचं म्हणणं.

ऑफिसमध्ये नव्याने आलेल्या मुलांना प्रमोशन मिळालंय पण ह्याला नाही. त्यात लग्नाचं वय निघून चाललेलं, या सगळ्या गोष्टींचं भयंकर टेंशन येतंय आणि जॉब सोडून देऊन कुठेतरी पळून जावसं वाटतयं, पण नव्याने घेतलेल्या गाडीचे हफ्ते त्या पगारातून जातायत म्हणून नाईलाजास्तव कसाबसा तो त्या नोकरीवर तग धरून आहे. अशा परिस्थितीत काय करावं हा त्याचा प्रश्न.


तो फायनान्शियल क्षेत्रात नोकरी करत होता. त्त्या क्षेत्राविषयी त्याला जरासुद्धा आवड किंवा आस्था नव्हती. केवळ कॉमर्स ग्रॅज्युअ‍ॅट आहे म्हणून तिथे नोकरीला चिकटला. त्याला मनोरंजन विश्वात खूप रस होता, (अ‍ॅनिमेशन, मिडिया, एंटरटेनमेंट,वगैरे.) पण त्या बाजूचं कसलंही शिक्षण नाही, अनुभव नाही.  घरचा एकुलता एक मुलगा असल्याने ग्रॅज्युएशन नंतर लगेचच नोकरी धरली होती. आणि त्या नोकरीत इतका भरडला गेला होता कि आता नव्याने कुठला कोर्स वगैरे  करण्याची मानसिक  ताकद किंवा उमेद शिल्लक राहिली नव्हती. 

माझ्याकडे येणार्‍या नोकरीसंबंधी केसेस मधले वरचे काही प्रॉब्लेम्स् अगदी नेहमीचे आहेत, राजकारण, श्रेय डावलणे, योग्यता असून प्रमोशन न मिळणे, वगैरे. आय.टी. पार्क आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकर्‍या करणारी मुले असोत किंवा इतर कुठेही नोकरी करणारी मुले असोत, अशा सगळ्या मुलांना मार्गदर्शन करताना माझ्या मनात सतत हाच विचार असतो कि 'करियर' हा आयुष्यातला एक महत्त्वाचा विषय. त्याच्या बाबतीतला इतका महत्त्वाचा निर्णय घेताना ज्योतिषाचा सल्ला घ्यावासा का नाही वाटत या लोकांना ? 

(आजच्या काळात ज्योतिषाचा तिरस्कार, अपप्रचार आणि टिंगलटवाळी करणारे घरोघरी सापडतात. त्याला बळी पडून कदाचित ज्योतिषाकडे सल्ला मागायला कमीपणा वाटत असावा किंवा लाज वाटत असावी.) 

अशा सगळ्या मुलांना मला फक्त एवढंच सांगावसं वाटतं,  कि करियर निवडताना  ज्याप्रमाणे  अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट असते. तसंच 'ज्योतिषी सल्ला' हि सुद्धा एक प्रकारची अ‍ॅप्टीट्यूड टेस्टच असते.
तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी काय चांगलं, काय वाईट हे त्यातून कळतं. चांगलं ते घ्यावं,
आणि वाईट घडू नये म्हणून काळजी घ्यावी. इतका साधा सरळ प्रकार असतो.  (मागे एका लेखात अशाच एका नास्तिक महोदयांचं मतपरिवर्तन झाल्याच एक उदाहरण दिलेलं आहे. ईच्छा असल्यास नजरेखालून घालावे.)

असो. पुन्हा केसकडे वळतो. आता मनोरंजन क्षेत्रात जायचं म्हणजे कलेचा कारक शुक्र ग्रह, त्याचं बळ हवं. त्याच्या पत्रिकेत ते नाही, जन्म तारखेत ते नाही आणि नावादेखील ते नव्हतं.  शनी महाराज सुद्धा खूप छान मदत करतात या क्षेत्रात जाण्यासाठी. ते देखील याच्या पत्रिकेत थोडे रुसलेलेच होते.

त्यात ह्याने कुठेतरी न्यूमेरोलॉजीच्या वेबसाईटवर वाचून स्वतःच स्वत:च्या नावात बदल करून घेतला होता. (अर्धवट ज्ञान नुकसानकारक असतं) कुंडलीतल्या ग्रहांनुसार सांगितलेले उपाय करायला जमणार नाही असं म्हणाला. तरी अधिकारवाणीने चित्तशुद्धीसाठी थोडे मंत्र दिलेच मी त्याला. आणि मग त्याच्या नावामध्ये  आवश्यक ते बदल करून शनी व शुक्रबळाची योग्य स्पंदने मिळतील असं नाव तयार करून दिलं.

दोन महिन्यांतर मागच्या रविवारी त्याचा ईमेल आला कि त्याला हव्या असलेल्या दुसर्‍या एका मोठ्या कंपनीतून त्याला ऑफर आली आहे, मोठं सॅलरी पॅकेज आहे. आणि सगळ्यात आंनदाची गोष्ट म्हणजे ती कंपनी फायनान्शियल कंपनी नसून  मनोरंजन विश्वातली एक आघाडीची कंपनी आहे - डिझनी !

रिलायंस टू डिझनी ट्रांझिशन अगदी जोरात पार पडलं. नवीन लोक चांगले वाटतायत.  वर्षभर चांगलं काम केलं तर अमेरिकेत जाण्याची संधी मिळेल. अजूनही बरेच काही फायदे मिळणार आहेत. त्यामुळे एकूणच खुश आहे तो आता.

नुसत्या नावाच्या बदलाच्या स्पंदनातून त्याला  इतका चांगला फरक पडलेला पाहून अंकशास्त्राच्या महानते विषयी खूप कौतुक वाटलं. 'नुसतं नावात बदल करून काय होणार ', 'ह्यात लॉजिक कुठे आहे', 'हे मनाला पटत नाही', अशा विचारांनी आणि शंकानी ग्रस्त असलेल्यांच्या मनाला थोडी उभारी मिळावी म्हणून  खास हि पोस्ट.  आवडली तर नक्की कळवा. शंका असतील तर जरूर विचारा !

|| शुभं भवतु ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा