ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

प्रत्यक्ष खाणीत जाऊन खणून आणलेल्या दुर्मिळ रत्न-स्फटिकांचे नैसर्गिक फोटो


नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एक छान योग जुळून आला. एका स्फटिकाच्या खाणीला प्रत्यक्ष भेट देण्याचा.
तिथे खणलेल्या स्फटिकांचे काही फोटो इथे देत आहे. कुणा अभ्यासकांना, किंवा या क्षेत्राची आवड असणार्‍यांना काही शंका असल्यास त्यांनी नि:संकोचपणे विचाराव्यात.

मी जेव्हा जेमॉलॉजीचा कोर्स करत होतो. तेव्हा बरीच दुर्मिळ रत्नं, स्फटिकं, वगैरे प्रत्यक्ष हाताळून पाहिली. त्यासंबंधीचा अभ्यास करताना खूप वेळा वाचलं-ऐकलं होतं कि, बरीचशी रत्न-स्फटिकं खाणीतून, म्हणजे भूगर्भातून सापडतात.  ती नेमकी कशी काढतात, कशी स्वच्छ करतात आणि मग कशाप्रकारे पुढील प्रक्रियेसाठी जातात ते मला बघायचं होतं. पण अशा खाणी खूप लांब लांब आहेत. तिथे उघडपणे असा कुणाला प्रवेश नाही. काही काही देशांमध्ये पर्यटनाचा भाग म्हणून खाण-परिसर असल्याने जाता येतं. तेही बाहेरच. जिथे मुख्य काम चालतं तिथे सोडत नाहीत.


तर अशाच एका खाणीत जाण्याचा योग आला होता. तिथून खणून आणलेल्या स्फटिकांचे हे काही निवडक फोटो :-दुर्मिळ व नैसर्गिक रत्ने आणि स्फटिके


स्वतःच्या हाताने मी हे सगळे स्फटिक खणून काढलेले आहेत. त्या प्रत्येकामध्ये असणारी ऊर्जा हि विकतच्या इतर स्फटिकांपेक्षा कैक पटीने जास्त आहे. मी तर इतका खूश होतो त्या दिवशी. तिकडून आल्यावर सगळ्या ओळखीच्या लोकांना, क्लाएंट्स, मित्र, नातेवाईक, अगदी सगळ्यांना मी फोटो दाखवले. दोन-चार क्लाएंट्सनी तर, त्या स्फटिकांची आहे त्याच्या पेक्षा पाचपट किंमत देण्याची तयारी दाखवली आणि मी ते विकणार आहे का हे विचारलं. पण असे प्रत्यक्ष खाणीतून स्वहस्ते खणून आणलेले स्फटिक विकायला माझं मन तयारच होत नाही.

ते न विकण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे - त्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये एक स्फटिकामध्ये एक लहानसा निळ्या रंगाचा स्फटिक दिसत असेल तुम्हाला. ते एक दुर्मिळ रत्न आहे. जे त्या दिवशी मला त्या खाणीत साचलेल्या पाण्याजवळ चिखलात सापडलं. चिखलात बरबटलेलं होतं, तरी ते बरोबर ओळखता आलं मला.  जेमॉलॉजीचा आणि स्फटिकशास्त्र (क्रिस्टल थेरेपी) चा अभ्यास कामी आला तिथे.  आता इतकं दुर्मिळ रत्न हाती लागल्यावर मी ते विकेन का ? आणि ते सुद्धा असं नैसर्गिक अवस्थेत असलेलं, कुठलीही रासायनिक प्रक्रिया न झालेलं, कुठल्याही मनुष्य वा प्राण्याचा स्पर्श देखील न झालेलं ?

जे कुणी रेकी हिलर, प्राणिक हिलर आणि क्रिस्टल थेरपीस्ट्स असतील त्यांना या गोष्टीचं महत्त्व जरा जास्त पटेल. त्यांच्यापैकी ज्यांची अध्यात्मिक बैठक उत्तम आहे. ते नुसते हे फोटो पाहून सुद्धा त्यातली ऊर्जा जाणू शकतात.


कधी कधी असं वाटतं, या प्रोफेशनचे किती फायदे आहेत ? वास्तूं-घरं-कारखाने या सगळ्यांना भेटी देणं, तिथला अभ्यास करणं, हे सगळं तर नेहमीच होत असतं. पण असं खाणीला भेट देणं, स्फटिक-रत्नं शोधण्यासाठी त्या दगड-मातीवर तूटून पडणं.  हे सगळं जरा विलक्षणच. :D

आज सकाळी हैदराबादवरून एक आमंत्रण आलं आहे. तिथल्या एका खाणीला भेट देण्याचं. अमेथिस्ट ची खाण आहे तिथे. (अमेथिस्ट हा शनीच्या नीलम रत्नाचं उपरत्न म्हणून वापरतात ) अजून तारीख नक्की ठरलेली नाही, पण बहुतेक येत्या जून महिन्यात जाणं होईल तिथे. तिकडून आल्यावर तिथे खणलेले अमेथिस्टचे फोटो टाकीन मी इथे.

नाही. ते देखील मी विकणार नाहीये.  :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा