ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

आर्थिक प्रयत्नांना यश येण्यासाठी सोप्पा उपाय: पैसा तुमच्या "हातात"

कुबेर मुद्रा आणि कुबेर मंत्र
पैसे मिळवण्याचे दैवी उपाय्/तोडगे असलेली अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत.

पण प्रत्येकाला ते जमतातच असं नाही, कारण त्यात दिलेले उपाय्/तोडगे करण्यासाठी वेळ द्यावा लागतो.

आवश्यक असलेली साधन-सामुग्री शुद्ध स्वरूपात सहजतेने मिळत नाही. जिथे मिळते तिथे फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप प्रकारचे वेगवेगळे प्रयत्न करून सुद्धा काही लोकांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. आणि मग निराश होऊन अशा गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडतो.


अपेक्षित परिणाम का मिळत नाही, फरक का पडत नाही, याची कारणे बर्‍याच वेळेस संबंधित व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत नाहीतर त्या व्यक्तीच्या घराच्या पत्रिकेत सापडतात. तो वेगळा विषय आहे. या पोस्टचा तो विषय नाही.

पण त्यातल्या त्यात, कमीत कमी वेळ देऊन अपेक्षित परिणाम मिळावा, म्हणून एक साधा, सरळ आणि सोप्पा उपाय इथे देत आहे. तो म्हणजे वर फोटोत दिसणारी योग मुद्रा

हि योग मुद्रा, 'कुबेर मुद्रा'  या नावाने देखील ओळखली जाते. (कुबेर हा संपत्तीकारक, धनवर्धक आणि भाग्यकारक देव आहे. कुबेराला देवांचा खजिनदार सुद्धा म्हणतात.)
  1. आठवड्यातून दोन-तीन वेळा (शक्य झाल्यास रोज ) किमान २० मिनिटे या मुद्रेत बसावे. 
  2. दोन्ही हातांनी हि योग मुद्रा करावी. 
  3. काही खाऊन झाल्यावर लगेचच हि मुद्रा करू नये. 
  4. थोडा वेळ (किमान तास-दोन तास) जाऊ द्यावा. 
  5. बाकी कशाचही बंधन नाही. 
  6. कुठेही, कसंही बसलं तरी चालेल. 
  7. अगदी टि.व्ही. बघता बघता केली तरी चालेल.

ज्या व्यक्ती थोडा जास्त वेळ काढू शकतात, त्या व्यक्तींनी सुखासन, पद्मासन अथवा अर्धपद्मासनात बसून हि योग मुद्रा केली, आणि या मुद्रेत बसून खाली दिलेला श्री कुबेर मंत्राचा जप केला. तर त्याचे फळ लवकर मिळते.

धनाकर्षक श्री कुबेर मंत्र :-

|| ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय, धनं धन्याधिपतये, धनं-धान्यं समृद्धिं मे देहि दापय दापय स्वाहा ||


दक्षता : हि एक 'योग मुद्रा' आहे.  आपल्या हातांमध्ये-बोटांमध्ये ऊर्जा केंद्रे असतात, प्रत्येक बोटासाठी काही विशिष्ट योजना आहे. पंचमहाभूतांपैकी एकेक बोटाशी संबंधित आहे.

हस्तसामुद्रिकातसुद्धा प्रत्येक बोटाला एकेक ग्रह दिलेला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण कुठलीही योग मुद्रा करतो, तेव्हा तेव्हा आपल्या मनात, शरीरात आणि एकूणच ऊर्जाविश्वात स्पंदनांद्वारे बदल होत असतात. याची जाणीव ठेवायला हवी.

तेव्हा आजारी आणि व नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींनी वैद्यकिय सल्ल्यानुसार अथवा एखाद्या अनुभवी योग-प्रशिक्षकाला विचारून मगच हि मुद्रा करावी.

तसेच, कन्सल्टिंगच्या वेळी तुम्हाला जे उपाय दिलेले आहेत ते करून झाल्यावर वा त्यांच्या जोडीने हि मुद्रा करावी. म्हणजे, समजा जर तुमच्या वास्तूमध्ये दोष असेल, तुमच्या स्वतः:च्या, वा घरातील इतर व्यक्तीच्या वा बिझनेसच्या नावात काही दोष असेल, पत्रिकेत दोष असेल, तिथे ग्रहबल कमी पडत असेल, वा इतर काही दोष असतील, तर आधी ते दोष  काढून टाकावेत आणि मगच दोषनिवारणासाठी दिलेल्या उपायांच्या जोडीने हि मुद्रा करावी.

काही प्रश्न वा शंका असल्यास विचारा खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.

तर मग आजपासून लगेचच सुरूवात करा, आणि काय फरक जाणवला ते इथे कळवलंत, तर आनंद वाटेल.  आपल्याला पडलेला फरक पाहून इतरांना हुरूप येईल.

|| शुभम भवतु ||
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा