ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

तुमच्या बिझनेसच्या जागेमध्ये हे दोष तर नाहीत ना?

Vastu and Feng Shui Tips For Business, Office, Shops
एखाद्या वास्तूत जेव्हा एकही सकारात्मक गोष्ट नसते तेव्हा नेमके काय उपाय करावेत हे कायमच आव्हानात्मक काम असतं. त्यातल्या त्यात ती वास्तू अंधार्‍या जागेत, तळघरात असेल तर प्रकरण जरा अवघडच होऊन बसतं.

एका व्यावसायिक जागेचं हे उदाहरण पहा. काही दिवसांपूर्वी एका व्यावसायिक बाईंनी मला त्यांची व्यवसायाची जागा बघायला बोलावलं.  त्यांच्या उद्योगधंद्याविषयी आणि  त्यात येणार्‍या अडचणींची सगळी हकिकत सांगितली.

त्यांची सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे, पैसा. जो काही केल्या येत नव्ह्ता.

त्यांचा व्यवसाय म्हणजे देशातील एका सुविख्यात व मोठ्या कंपनीची एक फ्रँचायझी त्यांनी घेतली होती.  पण त्यांच्याकडे कसलीही पैशाची आवक होत नव्हती. फ्रँचायझीची फि द्यायची थकली होती आणि त्यातून नफा काहीही होत नव्हता. त्यामुळे फ्रँचायझीवाल्यांनी त्यांच्याकडून फ्रँचायझी काढून घेण्याची धमकीवजा तंबी दिली होती.

त्यात भरीसभर म्हणून कामावर ठेवलेले दोन कर्मचारी कॅश बॉक्स मधले पैसे घेऊन पळून गेले होते. आणि या बाईंच्या जागेपासून १५ मिनिटांच्या जागेवर त्यांनी स्वतः एक दुसरी जागा भाड्याने घेऊन तिथे त्याच फ्रँचायझीवाल्यांकडून नवी फ्रँचायझी आपल्याला मिळावी असे प्रयत्न चालवले होते.

इकडे या बाईंकडे एकही नवा कर्मचारी टिकत नव्हता कारण त्याला वेळेवर पगार द्यायला पुरेसे पैसे नव्हते.  एक कर्मचारी मुलगी फक्त तिथे त्यांच्या मदतीला टिकून होती. त्यामुळे  रोज सकाळी लवकर कामाच्या ठिकाणी येऊन, अगदी झाडलोट करण्यापासून सगळी कामं त्या बाईंना एकटीला करावी लागत होती. एकूणच सगळ्या परिस्थितीला त्या बाई अक्षरशः कंटाळल्या होत्या.


त्यांची जागा मी व्यवस्थित पाहिली. आणि त्यात आढळलेले मुख्य दोष म्हणजे त्यांची जागा एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटला होती. आख्ख्या कॉम्प्लेक्सच्या अगदी टोकाचा, कॉर्नरचा गाळा या बाईंचा होता.

त्याच्या बाहेर लागूनच, नैऋत्येला मुख्य काऊंटरसमोर खोल गेलेली ड्रेनेज लाईन, आणि त्याच्यावर एक फुटका नळ, ज्याच्यातून सतत पाणी गळत होतं.  पूर्व-उत्तर-ईशान्य दिशा पूर्णपणे बंद.  मुख्य प्रवेश नैऋत्येला. बेसमेटची जागा असल्यामुळे फारसा प्रकाश नाही. एकही खिडकी किंवा साधा लहानसा झरोकाही नाही.

दक्षिणेला भिंतीवर देवी-देवतांच्या तसबिरी.
खाली दक्षिण-आग्नेय भिंतिला लागून कॅश-बॉक्स. आजूबाजूला कचर्‍याचे ढिग. पोती भरून अडगळ. फाईल्स्, कागदपत्र, इ. ना वाली नाही. ते उघड्यावर पडलेले. 

एकही सकारात्मक गोष्ट नसलेल्या त्या जागेला नेमके काय उपाय करावेत याचा विचार मी करत होतो. एक गोष्ट चांगली होती. ती जागा त्यांची स्वतःची नव्हती, भाड्याने घेतलेली होती.

मी हाच पहिला उपाय सुचवला कि शक्य तितक्या लवकर हि जागा सोडा आणि दुसरी जागा घ्या. कारण इतकी नकारात्मक ऊर्जा असलेली जागा सुधारायची म्हणजे त्याच पातळीवरचे, अन् तेवढ्याच ताकदीचे उपाय करावे लागणार. (रत्न-अध्याय,क्रिस्टल्स् वा धातू-अध्याय, वगैरे उपायांना थोडे जास्त पैसे लागतात, अर्थात् त्याचे रिझल्ट्स सुद्धा तसेच चमत्कारीक मिळतात) मग भाड्याने घेतलेल्या दुसर्‍याच्या मालकीच्या जागेत एवढा खर्च करून उपाय करण्यापेक्षा दुसरी चांगली जागा बघणं जास्त चांगलं, असा सल्ला मी दिला.

पण हि जागा सोडून दुसरी घेण्याइथपतही त्यांची परिस्थिती नव्हती. त्या जागेचं भाडं देखील थकलं होतं.
म्हणून मग त्यातल्या त्यात करता येण्यासारखे सगळे उपाय मी सुचवले.

अडगळ दूर करून सगळी कागदपत्रं, फाईल्स् नीट ठेवायला सांगितल्या.  स्वच्छता, नीटनेटकेपणा कशी राखता येईल इथपासून ते अगदी त्रासलेल्या ग्राहकांना कसं हँडल करावं, इथपर्यंत सगळं त्यांना समजावून सांगितलं.

काही फोटो त्या जागेत चिकटवायला सांगितले. जपासाठी मंत्र लिहून दिले. काही प्राणायाम, व योग मुद्रा , त्या कशा व कधी करायच्या या संबंधीची योग्य माहिती सचित्र पाठवून दिली. शक्य ते सगळे उपाय करून दिले. या सगळ्याच्या बरोबर स्वतःच मानसिक आरोग्य कसं सांभाळावं याच्याही चार टिप्स् दिल्या.

आणि आज दोन महिन्यांनतर त्या बाईंचा फोन आला. त्यांना पडलेला फरक, आणि झालेल्या सुधारणा पुढीलप्रमाणे :-
पैशाची आवक वाढलेली आहे. फ्रँचायझीची फि पूर्ण देऊन झालेली आहे.  त्यामुळे ती काढून घेण्याचा  आता प्रश्नच उरलेला नाही. त्यांच्याकडून पैसे चोरून पळून गेलेल जे दोन कर्मचारी होते, ज्यांनी या बाईंच्या नाकावर टिच्चून जवळच जागा घेतली होती. त्यांना फ्रँचायझी मिळालेली नाही. त्यामुळे ती जागा सोडून ते आता दुसर्‍या शहरात गेलेले आहेत फ्रँचायझी मागायला.

धंदा वाढल्यामुळे चार नवीन कर्मचारी कामावर ठेवलेले आहेत. सगळ्यांचे पगार सुरळीत चालू आहेत. त्या बाईंना आता रोजच्या रोज उद्योगाच्या जागी यावं लागत नाही. सगळे कर्मचारी त्यांच्या अपरोक्ष सगळा कारभार व्यवस्थित पाहतात. कुणीही पैसे चोरत नाही, सगळा हिशोब जागच्या जागी असतो. 

कामाचा वाढलेला व्याप पाहता मालाची ने-आण करता यावी म्हणून नुकतीच एक नवीन गाडी विकत घेतलेली आहे. इतक्या कर्जबाजारी अवस्थेत स्वतःच्या मालकीची चारचाकी गाडी होईल, असं त्यांना कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, पण सहा महिन्याच्या आतच दारात गाडी उभी राहिली आहे.

तुम्ही देखील व्यवसाय-उद्योग करता का, जो खूप प्रयत्न करून देखील चालत नाही ?

तुमच्या व्यवसायाच्या वास्तूमध्ये देखील असा एखादा दोष असू शकतो. योग्य वेळी सल्ला घेऊन दोष काढून टाका. काही शंका असल्यास इथे संपर्क करू शकता. :-  वास्तू सल्ला व मार्गदर्शन

|| शुभं भवतु ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा