ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

देवाला कनेक्टिव्हीटी च्या रेंज मध्ये आणण्यासाठी सोपा उपाय

बालासन : सरेंडर पोज्/चाईल्ड पोज्आजच्या ईंग्रजी शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांना देवाची चार स्तोत्र म्हणणं जीवावर येतं. घरातल्या लोकांनाच जिथे देवा-धर्माची फारशी माहिती नसते, कसलीही आपुलकी वा ओढ नसते, तिथे या मुलांना काय दोष देणार ?  अशा परिस्थितीत सल्ल्यासाठी आलेल्या कुणा व्यक्तीला देवाचे काही मंत्र दिले, काही सोपी स्तोत्रं सांगितली तरी ते कसंबसं उरकल्यासारखं वाचून मोकळे होतात. त्यांच्यादृष्टीने हे मंत्र-स्तोत्रपठण म्हणजे एक  'असाईनमेंट'  असते, आणि दिलेली जपसंख्या म्हणजे 'डेडलाईन'.

असे जे 'अल्ट्रा-मॉडर्न' क्लाईंट्स माझ्याकडे सल्ल्यासाठी येतात, त्यांच्यापैकी एकीशी एका विवाहात गाठ पडली, आणि आमच्यात पार पडलेला हा संवाद (अनावश्यक गोष्टी टाळून थोडक्यात,  उपायासह ) :-


" देवाचं करावंसं खूप वाटतं रे, पण काही केल्या मी देवाशी 'कनेक्ट' होत नाहीये" - ती तरूणी (माझ्या नात्यातली, दूरची बहिण समजा हवं तर)

"देवाशी कनेक्ट होत नाहीये म्हणजे ? नक्की काय वाटायला हवंय तुला ? आतून भक्तीभाव दाटून येत नाही, भावना जाणवत नाहीत,  असं  म्हणायचंय का ?" - मी

" हो तसंच काहितरी. कारण अरे, मी रोज देवापुढे उभी राहते, नमस्कार करते आणि निघून जाते, कित्येक वेळा देव्हार्‍यातल्या देवांकडे लक्षसुद्धा नसतं माझं.  मला तर हे पण आठवत नाहीये कि आमच्या  देवघरात नक्की किती  आणि कोणकोणते देव आहेत. मी फक्त नेमून दिलेलं काम असल्यासारखी देवापुढे जाऊन येते.  कसलीही अटॅचमेंट वाटत नाही. आता याच्यावर काही उपाय असेल तर सांग मला "

तिला एक उपाय सांगितला, तो नियमितपणे करते ती आणि आता तिच्या घरचे देव तिच्या कनेक्टिव्हिच्या रेंज मध्ये आलेत असं वाटतंय तिला.

तुमची अवस्थादेखील तिच्यासारखीच असेल, तुमचे देव देखील तुम्हाला संपर्क क्षेत्राच्या बाहेर वाटत असतील, तर तोच उपाय तुमच्यासाठी इथे देत आहे.
दररोज किमान १० सेकंद ते २-३ मिनिटे वर फोटोमध्ये दिलेलं योगासन करावे. सुरूवात ५-ते १० सेकंदापासून करावी आणि मग जमेल तसं पुढे वेळ वाढवत न्यावा.  काही ठिकाणी लोक याला 'सरेंडर पोज्' असं म्हणतात. म्हणून मी याला 'शरणासन' म्हणतो.

योगशात्रात या आसनाला 'बालासन' असे म्हणतात. हेच याचं खरं नाव आहे.  आता हे योगासन नेमकं कसं करावं, याविषयीची माहिती हवी असल्यास, इंटरनेटवर 'बालासन वा सरेंडर पोज् / चाईल्ड पोज् ' या नावांने सर्च करून बघा. हे योगासन करण्याच्या स्टेप्स् मी इथे देऊ शकलो असतो, पण मुद्दाम देत नाहीये. कारण तुम्ही स्वतः जेव्हा सर्च कराल, तेव्हा तुम्हाला हे योगासन कसं करायचं, इथपासून ते त्याचे शारिरीक/मानसिक आरोग्यविषयक फायदे, त्याला पूरक असलेली आणखी २-४ वेगवेगळी योगासने, वगैरे, जास्तीची माहिती मिळेल, जी खूप उपयुक्त आहे. तिथे इंटरनेटवर तुम्हाला या योगासनाची 'देवाशी कनेक्ट' होण्यासंबंधीची माहिती कुठेही मिळणार नाही. कारण तो आमच्या अभ्यासातून व अनुभवातून आलेला प्रकार आहे. तेव्हा तिथून फक्त आरोग्यविषयक माहिती तेवढी घ्यावी.  

दक्षता :  मागे एके ठिकाणी योग मुद्रेच्या बाबतीत घ्यावयाची दक्षता दिलेली आहे. तशीच ती योगासनाच्या बाबतीत देखील आहे. गुडघे, पाठ, पाठिचा कणा, पोटाचे विकार, वगैरे आजार असणार्‍या व्यक्ती आणि इतर दुर्बल व्यक्तींनी वैद्यकीय व प्रशिक्षीत योगशिक्षकाचा सल्ला घेतल्याशिवाय हे योगासन करू नये.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा