ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

डान्समध्ये करीअर करायचंय? प्रचंड लोकप्रियता, भरपूर पैसा, जागतिक दर्जाचे मान-सन्मान मिळवण्यासाठी उपाय

How to Become a Successful Dancer
एक नर्तक/नर्तिका(डान्सर) म्हणून तुमचं सगळ्यात मोठं स्वप्नं काय आहे?

स्वतःचा एखादा डान्स ग्रुप तयार करून जगभरात नृत्याचे भव्यदिव्य कार्यक्रम करायचे आहेत?
स्वतःचा एखादा म्युझिक अल्बम काढून, प्रचंड लोकप्रियता मिळवून, ग्रॅमी अ‍ॅवार्ड जिंकायचं आहे?
नृत्यदिग्दर्शक (कोरिओग्राफर) म्हणून चित्रपट क्षेत्रात खूप नाव कमवायचं आहे?

यापैकी तुमचं स्वप्नं कुठलंही असलं तरी ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला अंकशास्त्र अर्थात् न्यूमेरॉलॉजी मदत करू शकतं.

कसं ते पाहूयात.
( अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा नेमका कशाप्रकारे फायदा होतो हे तुम्हाला माहिती असेल अशी अपेक्षा करतो. समजा तुम्हाला त्याची अजिबात महिती नसेल, तर हा लेख वाचण्याआशी हे दोन लेख वाचा. अंकशास्त्राची तोंडओळखअंकशास्त्राचे चमत्कार )

लीगल नोटीस, अटक वॉरंट आणि कोर्ट केसः तुरुंगवास कसा टाळावा? केस जिंकण्यासाठी काय करावं?

Astrology Remedies to Win a Court Case
तुमच्यावर वा तुमच्या मित्रा-नातेवाईंकावर कुणी केस केली असेल व ती केस कोर्टात उभी राहिली असेल, आणि आता ती जिंकण्यासाठी काय करावं याच्या चिंतेत तुम्ही असाल तर हि पोस्ट तुम्हाला थोडा दिलासा देईल अशी अपेक्षा करतो.

राजकारणात उतरताय? निवडणुका जिंकून सत्ता मिळण्यासाठी हे ग्रहयोग तुमच्या पत्रिकेत असायला हवेत


Astrology For Political Success
 राजकारण गल्लीतले असो वा दिल्लीतले, ज्योतिषशास्त्र फार पूर्वीपासून राजकारण व राजकारणी यांच्याशी जोडले गेले आहे. जगभरातल्या मोठमोठ्या राज्यकर्त्यांनी ज्योतिषाचा आधार घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. आजही अनेक दिग्गज नेते महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी ज्योतिष सल्ला घेतात, पण जाहीरपणे ते बोलून दाखवत नाहीत. असो.

आपण आजूबाजूला अनेक नेते बघतो जे राजकारणात खूप यशस्वी होतात. पण कधी कधी प्रचंड 'अनुभव' असलेले नेते 'शक्य ते सगळे प्रयत्न' सुद्धा निवडणुकीत मोठ्या फरकाने पडतात, आणि अजिबात अपेक्षा नसलेले, नवखे उमेदवार अगदी सहजपणे निवडून येतात. वर्षानुवर्षे नेटाने कामं करणार्‍या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाकडून तिकिटं मिळत नाहीत, आणि मागाहून आलेल्यांना किंवा पक्षांतर केलेल्यांना संधी मिळते. काही काही लोकांची अशी अवस्था असते, कि त्यांनी काम केलेलं असतं, पैसा असतो, कार्यकर्ते असतात, तिकिट सुद्धा मिळालेलं असतं, तरी ते पडतात. कितीहि वेळा निवडणूकीला उभे रहा, दरवेळी ते पडतातच.

हे असं का होतं आणि नेमक्या कुठल्या ग्रहांमुळे, सामान्य माणसाला राजकारणात करीयर करायला संधी आहे का? त्यासाठी ज्योतिष कशाप्रकारे मदत करू शकतं ते बघूयात...

जेव्हा अमेरीकन 'वॉल स्ट्रीट' वाले बिझनेसमेन त्यांच्या 'कंपनीची कुंडली' काढतात तेव्हा...


Business Horoscope: Kundali of Your Company
मनिला (फिलिपाईन्स) च्या एका क्लायंटशी नुकतीच ईमेलवरून चर्चा झाली. त्यानंतर विचार करता करता 'कंपनीची कुंडली' म्हणजे 'जन्मपत्रिका' तयार करून त्यावरून बिझनेस कसा वाढवता येईल यावर अभ्यास चालू होता. त्यात काही गंमतीशीर आणि उपयुक्त गोष्टी माझ्या समोर आल्या, म्हटलं ब्लॉग वर शेअर करू, म्हणजे बर्‍याच लोकांना त्याचा उपयोग होईल.

लग्न जमत नाही, लग्नाला उशीर होतो, ठरलेलं लग्न मोडतं. असं का होतं? यावर उपाय काय?


विवाहासाठी ज्योतिष उपाय
लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. ते नेमकं कधी करावं यावर अनेकांची अनेक मते असतात.

"लवकर करावं म्हणजे सगळं काही वेळच्या वेळी होतं", इथपासून, "आयुष्यात आधी सेटल होऊ दे, स्वतःच घर घेऊ दे, आणि मग बघू" इथपर्यंत.

ज्यांना इतक्यात लग्न करायचं नाही त्यांना भरमसाठ स्थळं चालून येतात, आणि जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत त्यांना चांगलं स्थळच मिळत नाही.


काही वेळा तर सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरळीत चालू असतानादेखील शेवटच्या क्षणी लग्न मोडतं.

आता गौतमचीच गोष्ट बघा ना...

रिअल इस्टेट एजंट आणि बिल्डर्/डेव्हलपरसाठी हमखास यश देणारे विशेष वास्तू व ज्योतिष मार्गदर्शन

Remedies For Real Estate Agents to Buy or Sell Properties


या आधी मी अनेक वेळा वेगवेगळ्या ठि़काणच्या लिखाणात नमूद केलंय कि माझ्याकडे रिअल ईस्टेट मधले अनेक क्लायंट्स् विचित्र केसेस घेऊन येत असतात आणि त्यात मी जे काही उपाय सुचवतो त्याचे रोमांचक अनुभव ऐकायला मिळतात. तशीच जरा अलीकडे घडलेली एक गोष्ट सांगतो.

नामस्मरणाची एक गंमतीशीर गोष्ट. नारद मुनी, पोपट आणि प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू

Narada Muni with Lord Vishnu and Goddess Laxmi
एके दिवशी महर्षी नारद यांच्या मनात एक शंका आली कि देवाचं नामस्मरण का करायचं?  त्याच्यात नेमकी कसली शक्ती आहे? त्याचं फळ काय ?

खरं तर हि खूप आश्चर्याची गोष्ट होती, कारण नारद मुनी स्वतः "नारायण, नारायण", म्हणत त्यांचे आराध्य असलेल्या भगवान श्रीविष्णूच्या नामस्मरणात सतत दंग असतात. त्यामुळे अशी शंका त्यांच्या मनात येऊच कशी शकते असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते, कि आपण जे काही करतो ते सगळं अचानकपणे थांबवून नसत्या शंका घेत बसतो. विचार करत बसतो कि याचा खरंच काही उपयोग होणार आहे कि नाही?

तर असाच एक प्रसंग नारद मुनींवर त्यादिवशी या शंकेच्या रुपाने आला होता.

तुमचा पार्टनर समलिंगी (गे किंवा लेस्बियन) आहे का हे जन्मपत्रिकेवरून कसे ओळखाल?


How to Know If a Person is Gay or Lesbian
जोडीदार समलिंगी असल्यामुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. बर्‍याचवेळा मला कॉलेजात जाणार्‍या तरूण-तरूणींचे किंवा नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यांचे ईमेल्स येत असतात, तेव्हा त्यात एक प्रश्न गेल्या २-३ वर्षांत कॉमन झाला आहे. तो म्हणजे, "माझा प्रियकर वा प्रेयसी, नवरा वा बायको समलिंगी तर नाही ना? जन्मकुंडली बघून तुम्ही सांगू शकाल कि तो/ती समलिंगी आहे का?".

जन्मपत्रिकेवरून माणसाचा स्वभाव, आरोग्य, प्रेमप्रकरणे, विवाह, संतती, वगैरे सर्वश्रुत असलेल्या सगळ्या गोष्टी जशा कळतात, त्याचप्रमाणे खाजगी आयुष्यातील लैंगिकतेविषयीच्या गोष्टी सुद्धा कळतात.

आपली प्रार्थना देवापर्यंत 'त्वरीत' पोचवण्यासाठी मोबाईल फोनसदृश सोय

मागे एका लेखात मी देवाला कनेक्टिविटीच्या कक्षेत आणण्यासाठीचा उपाय दिलेला होता, तसेच ईच्छापूर्तीसाठी देवाकडे नवस कसा मागावा हे देखील सांगितलेलं आहे. हा लेख म्हणजे त्याच्याच पुढचा भाग.

प्रार्थनेत खूप शक्ती असते, असं म्हणतात. पण त्यासाठी ती प्रार्थना देवापर्यंत पोचायला तर हवी. ती पोचवायची कशी ? कोण मदत करेल ?

समजा, आपल्याला दुसर्‍या देशातल्या एखाद्या व्यक्तीला एक निरोप पाठवायचा आहे. तर तो निरोप त्वरीत पोचावा यासाठी आपण संदेशवहनाची कोणकोणती साधनं वापरू ?  तो निरोप जर आपण साध्या डाकसेवेने (पत्राद्वारे) पाठवला, तर असा निरोप पोचायला किमान काही आठवडे तरी लागतील. हेच जर आपण कुरियरने निरोप पाठवला तर थोडा लवकर पोचू शकेल. पण आपण जर थेट फोनच केला, तर मात्र तो निरोप त्वरीत पोचू शकेल. बरोबर ? 

हेच देवांच्या बाबतीत कसं होईल ? तिथे आपल्याला कोण मोबाईल जोडून देणार ?